GIrish Chodankar
GIrish Chodankar 
गोवा

कर्नाटकातील ट्रकांमुळे स्थानिकांना धोका

Dainik Gomantak

मडगाव

खाण पट्ट्यात सध्या जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली कोरोनाचा फैलाव झालेल्या कर्नाटकांतून येणाऱ्या सुमारे २०० ट्रकांची बेदरकार वाहतूक सुरू असून, स्थानिकांना धोका निर्माण करणाऱ्या ट्रकांच्या या वाहतुकीवर सरकारने नियंत्रण आणावे, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
देशात टाळेबंदीमुळे आंतरराज्य वाहतूक बंद असताना गोवा सरकारने खनिज ट्रक वाहतुकीला कोणत्या आधारे परवानगी दिली, हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. आपल्या भांडवलशाहीचा अजेंडा पुढे नेण्यासाठी मोदी सरकारने खाण व्यवसायाचा जीवनावश्यक सेवामध्ये समावेश केला आहे का, हे भाजप सरकारने लोकांना सांगावे, असे चोडणकर म्हणाले.
स्थानिक खाण अवलंबीतांवर सध्या उपासमारीची पाळी आलेली असताना, गोमंतकीयांचे ट्रक वापरणे सोडुन सरकार आज कर्नाटकांतील ट्रक मालकांना व चालकांना परवानगी देते, यावरुन गोव्याच्या भाजप सरकारची गोमंतकीयांप्रती असंवेदनशीलता परत एकदा उघड झाली आहे. गोवा सरकारला हवे असल्यास गोमंतकीयांचे ट्रक वापरण्याची विनंती ते कर्नाटकातील खाण मालकांकडे करु शकले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या कर्नाटकातुन येणारे ट्रक ड्रायव्हर, क्लिनर यांची कोरोना चांचणी केली जाते का व त्यांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र कोण देतो हे सरकारने लोकांना सांगणे गरजेचे आहे. दररोज कर्नाटकांतुन येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर वा क्लिनरकडुन गोमंतकीयांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यानी ताबडतोब खाणपट्ट्यात पोलीस व वाहतुक अधिकाऱ्याना पाठवुन बेदरकार वाहतुकीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.टाळेबंदीमुळे त्रस्त असलेल्या गोमतकीयांना क्षुल्लक कारणांसाठी चलन देऊन त्यांची सतावणूक करणाऱ्या पोलिसांची खरी गरज खाण पट्ट्यात आहे. गोवा दिवाळखोरीत काढलेल्या भाजप सरकारने लोकांना चलन देऊन महसूल गोळा करण्याचे नवीन धोरण आखले आहे का, हे मुख्यमंत्र्यानी सांगावे, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT