sea Dainik Gomantak
गोवा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Canacona Illegal Liquor Transport: मद्यतस्करी कर्नाटकात करण्यात येणार असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona Illegal Liquor Transport

निवडणूक काळात मद्यतस्करीसंदर्भात चेकनाक्यांवर वाहनांची कडक तपासणी सुरू असल्याने जलमार्गान मद्यतस्करीचा मार्ग काही दलालांनी स्वीकारला होता.

काणकोण येथील समुद्रीमार्गे कर्नाटकमध्ये मोटार होडीतून तस्करी करणाऱ्या पोळे येथील राजू नाईक याला काणकोण पोलिसांनी अटक केली. बोटीतून सुमारे 1.85 लाखांची दारू जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

सध्या चेकनाक्यावर कसून तपासणी होत असल्याने दारूची तस्करी जलमार्गाने होत असल्याची माहिती काणकोण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपासून पोलिसांनी पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर साध्या वेशात गस्त ठेवली होती.

मंगळवारी रात्री एक मोटार होडी समुद्रकिनारी दृष्टीस पडली. त्यामध्ये एक व्यक्ती होती. या होडीची झडती घेतली असता मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. ही मद्यतस्करी कर्नाटकात करण्यात येणार असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

संशयित राजू नाईक याला अटक करून जामिनावर त्याची सुटका झाली. संशयित हा पोलिस खात्यातील एका उपनिरीक्षकाचा नातेवाईक असल्याने या मद्यतस्करीमागे त्याचा हात असल्याची चर्चा स्थानिकांत सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दिल्ली ते गल्लीतील गुन्हेगारांचे 'गोवा' आश्रयस्थान बनू नये..

Goa Accidental Deaths: गोव्यात वर्षाकाठी 300 हून अधिक लोकांचे रस्ते अपघातांत बळी! ही परिस्थिती कधी बदलणार?

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Ram Temple Film: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

SCROLL FOR NEXT