Lifeguards warn of indefinite strike from tomorrow in Goa
Lifeguards warn of indefinite strike from tomorrow in Goa 
गोवा

गोव्यातील जीवरक्षकांचा उद्यापासून बेमुदत संपचा इशारा..

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी : राज्यातील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांनी आज पणजीतील पर्यटन भवन येथील पर्यटन संचालकांना भेटण्यास गेले असता सरकारी बैठकांमुळे ते भेटू शकले नाहीत. त्यांनी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर भेटण्याची वेळ दिल्याने या जीवरक्षकांनी त्याना भेटल्याशिवाय न जाण्याचा पवित्रा घेतला आहे. या मरिन जीवरक्षक संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी संचालकांकडून भेट देण्यास होत असलेल्या टोलवाटोलवीबद्दल खंत व्यक्त केली. 

जोपर्यंत संचालक भेटत नाहीत तोपर्यंत तेथून न हटणार नाही. गेले १४ महिने सुमारे २५० जीवरक्षक बेरोजगार आहेत. त्यांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडाळात सामावून घेण्याचे सरकारने आश्‍वासन दिले, मात्र दुसऱ्या बाजूने दृष्टी कंपनीबरोबर नवा करार करून नव्या जीवरक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात परवानगी दिली आहे. दृष्टीने त्यासाठी जाहिरातही दिली आहे. त्यामुळे या जीवरक्षकांचे पुढे काय असा प्रश्‍न केरकर यांन केला. पर्यटन संचालकांनी या जीवरक्षकांचा प्रश्‍न सोडविला नाही तर उद्यापासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला.

सरकारने आश्वासन दिल्यानुसार जीवरक्षकांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या सेवेत घ्यावे अशी मागणी जीवरक्षक करत आहेत. दृष्टी मरीन कंपनीकडे गोव्यातील किनाऱ्यांवर जीवरक्षक पुरवण्याचे कंत्राट आहे. या कंपनीच्या कंत्राटी जीवरक्षकांना पुरेशा साधन सुविधा उपलब्ध नसताना जीवाची पर्वा न करता काम करावे लागते. यासाठी गेल्यावर्षीदेखील आंदोलने करणअयात आली होती, परंतु परिस्थिती सुधारण्याकरिता काहीच प्रयत्न केले गेले नाहीत.

गेल्यावर्षीच्या आंदोलनानंतर जीवरक्षकांना महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन गोवा पर्यटन विभागाने दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने जीवरक्षकांनी आज पर्यटन संचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत कार्यालयाला घेराव घातला.

अधिक वाचा :


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT