Leopard Dainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: ..पुन्हा बिबट्याची दहशत! लामगाव परिसरात भीतीचे वातावरण

Leopard At Lamgao Bicholim: दोन-तीन आठवड्यांपासून या परिसरात बिबट्याच्या वावराची चाहूल स्थानिकांना लागली असून यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरल्याचा दावा लामगाव परिसरातील नागरिकांनी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Leopard At Lamgao Bicholim

मये: मुळगाव आणि धबधबा डिचोली येथे आपली दहशत पसरविल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने आपला मोर्चा डिचोली शहरातील लामगाव येथे वळवला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून या परिसरात बिबट्याच्या वावराची चाहूल स्थानिकांना लागली असून यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरल्याचा दावा लामगाव परिसरातील नागरिकांनी केला आहे. गेल्या आठवड्यात या भागातील विष्णू जाननाईक यांच्या घरातील पाळीव कुत्र्यावर अंगणात बसलेला असताना बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची माहिती येथील रहिवाशी देविदास गोवेकर यांनी दिली आहे.

जखमी कुत्र्याला धड गिळताही येत नसल्याचे त्यांनी सांगितले.‌ गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून या भागातील भटक्या कुत्र्यांची संख्याही कमी होऊ लागल्याने बिबट्याच्या हालचालीचा संशय आल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, बिबट्याच्या सतत वावरामुळे रात्रीच्या आणि दुपारच्या वेळीही निर्जन रस्त्यावरून मुलेबाळे तसेच मोठ्यानाही बाहेर फिरणे धोकादायक बनले आहे. बिबट्याची डरकाळी आपल्याला स्पष्टपणे ऐकू आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची विनंती स्थानिकांनी वनविभागाकडे केली आहे.

याआधी गावकरवाडा मुळगाव आणि धबधबा डिचोली येथील स्थानिकांनी पण बिबट्याच्या हालचाली अनुभवल्या आहेत. गावातील अंतर्गत जंगल नष्ट झाल्याने मानवी वस्तीत बिबट्याच्या हालचाली दिवसेंदिवस वाढत असल्याचा अंदाज आहे. एके काळी लामगाव हे सुंदर जंगल, वनस्पती आणि प्राणी यांनी नटलेले गाव होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या विकासामुळे वन्य प्राण्यांना राहण्यासाठी जागा नसल्याने या भागातील वनक्षेत्र नष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT