Mapusa police have registered a case against a girl who posted a controversial post on social media regarding Homkund Dainik Gomantak
गोवा

Lairai jatra: लईराई देवीच्या जत्रोत्सवादरम्यान तरुणीकडून वादग्रस्त पोस्ट; भाविकांची पोलिस ठाण्यावर धडक

Mapusa Police: हिंदू जनजागृतीचे गोविंद चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्थानकावर धडक दिलेल्यांमध्ये शिरगावसह अन्य भागातील भक्तांचा समावेश होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Lairai jatra: लईराई देवीच्या जत्रोत्सवाचे वैशिष्ट्य असलेल्या होमकुंड संदर्भात एका युवतीने समाज माध्यमावर टाकलेल्या ‘पोस्ट’ वरुन लईराई देवीच्या भक्तगणांमध्ये खळबळ माजली आहे. हा आक्षेपार्ह पोस्ट म्हणजे श्री लईराई देवीचा अपमान आणि देवीच्या भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे.

असा दावा करीत लईराई देवीवर श्रद्धा असलेल्या भक्तगणांनी आज (मंगळवारी) सायंकाळी डिचोली पोलिस ठाण्यावर धडक दिली. हिंदू जनजागृतीचे गोविंद चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्थानकावर धडक दिलेल्यांमध्ये शिरगावसह अन्य भागातील भक्तांचा समावेश होता.

दरम्यान, म्हापसा पोलिसांनी संशयित मुलीवर भारतीय दंड संहितेच्या कलम २९५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. म्हापसा पोलिस स्थानकात सायंकाळी उशिरा मोठ्या संख्येने जमले व त्यांनी लईराई मातेच्या घोषणा दिल्या. दरम्यान, सायंकाळची वेळ असल्याने आम्ही संशयित मुलीला स्थानकात बोलावू शकत नाही.

सकाळी तिला बोलून चौकशी करू, असे पोलिसांनी (Police) सांगितले. मात्र भक्तगण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलीस निरीक्षक निखिल पालेकर तसेच उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत नाईक चोपडेकर यांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेतले.

होमकुंड ही जत्रोत्सवाची परंपरा !

होमकुंड ही श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाची संस्कृती आणि मोठी परंपरा आहे. मात्र, बार्देश मधील स्विडेल रॉड्रीगिज नामक युवतीने ही संस्कृती नव्हे तर पर्यावरणाची हानी आहे. अशा आशयाचा पोस्ट समाज माध्यमावर केला आहे. हा पोस्ट म्हणजे लईराई देवीचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे, असा देवीच्या तमाम भक्तांचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT