म्हापसा: फसवणूक प्रकरणात गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटनुसार म्हापसा पोलिसांनी बर्डे यांना गुरुवारी (२० फेब्रुवारी) रात्री अटक केली. फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनसार, एका फसवणूक प्रकरणात संजय बर्डे यांच्याविरोधात राजवाडा पोलिस स्थानकात गुन्हा नोंद आहे. या खटल्याशी संबधित न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटनुसार म्हापसा पोलिसांनी संजय बर्डे यांना गुरुवारी रात्री अटक केली. बर्डे यांना शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) कोल्हापूर प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
राजकीय सुडापोटी उकरुन काढली केस
२००८ मधील रोड रोलर संबधित ही फार जुनी केस आहे. रोड रोलर भाड्याने आणला होता तो त्यांनीच चोरुन नेला आणि माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा एकप्रकारे बदला घेण्याचा प्रकार असून, राजकीय सुडापोटी ही केस उकरुन काढली आहे. पण, मी माझे काम करतच राहिन कोणाला घाबरण्याची गरज नाही, असे संजय बर्डे यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.