Petrol-Diesel Price In Goa
Petrol-Diesel Price In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत दरवाढ, दक्षिण गोव्यातील दरामध्ये घट; जाणून घ्या आजच्या किंमती

Akshay Nirmale

Goa Petrol-Diesel Price: जागतिक पातळीवर क्रुड तेलाच्या दरांवरून तेल कंपन्या दररोजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करत असतात. त्यामुळे दररोज या इंधन दरांमध्ये बदल होत असतात. शनिवारीही गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरात वाढ दिसून आली. यामध्ये उत्तर गोवा आणि पणजीतील दरांमध्ये वाढ झाली तर दक्षिण गोव्यातील दरांमध्ये घट झाली आहे.

शुक्रवारच्या तुलनेत उत्तर गोवा आणि पणजी येथील पेट्रोल दरांमध्ये प्रतीलीटरमागे 33 पैशांची वाढ झाली तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरात मात्र 25 पैशांची घट झाली आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये उत्तर गोवा आणि पणजी येथे प्रतीलीटर 33 पैशांची वाढ झाली तर दक्षिण गोव्यात मात्र प्रतीलीटर 24 पैशांची घट झाली.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.22

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.79

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT