नौदल युद्धनौकेच्या ‘सोनार डोम’चे उदघाटन
नौदल युद्धनौकेच्या ‘सोनार डोम’चे उदघाटन 
गोवा

नौदल युद्धनौकेच्या ‘सोनार डोम’चे उदघाटन

प्रतिनिधी

पणजी: गोव्यातील  कायनेको लिमिटेड या कंपनीने भारतीय नौदलासाठी पहिल्या ‘सोनार डोम’ची निर्मिती केली आहे. या डोमचे उदघाटन गोव्याचे मा. मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत  पिळर्ण येथील कायनेकोझ मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये पार पडले.

सोनार डोम हा वॉरशिपचा म्हणजेच युद्धनौकेचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यावेळी या डोमला मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई (एमडीएल) यांना  सन्मानार्थ देण्यात आले. पी १५ अल्फा वॉरशिपवर ते माउंट केले जाणार आहे. सोनार डोममध्ये (सोनार नेव्हिगेशन आणि रंगिंग) अ‍ॅरे उपलब्ध असते. ज्याला  वॉरशिप किंवा पाणबुडीचे डोळे आणि कान समजले जातात आणि याचा महत्वपूर्ण वापर नॅव्हिगेशन आणि रेंजसाठी केला जातो.

या आभासी सोहळ्यास अनेक मान्यवरांनी अभिवादन दिले. नौदल कर्मचाऱ्यांचे प्रमुख सल्लागार भास्कर बर्मन, भारतीय नौदलातील एमडीएलची शिप बिल्डिंग संचालक, रेडम ए के सक्सेना, (आयएन रिटायर्ड), प्रकल्प अधीक्षक एमडीएलचे (पी १७ ए फ्रिगेट) श्री बिजू जॉर्ज, व्यवस्थापकीय संचालक आणि लढाऊ अभियांत्रिकी प्रणालीचे शस्त्रास्त्र (एसीई) प्रवीण के मेहता, उत्कृष्ट शास्त्रज्ञ, डेव्हलपमेंट आस्थापनेचे (इंजिनियर्स) संशोधन संचालक, प्रीमियर सिस्टम इंजीनियरिंग संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची प्रयोगशाळा (डीआरडीओ) व्ही. व्ही. परळीकर आणि अधिकार वासुदेवन - सीएमडीई (डब्ल्यूपीएस), संजय छाबरा सीएमडीई (एडब्ल्यूपीएस) उपस्थित होते. समारंभाला सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य रेड्डी आणि इंडो नॅशनल लिमिटेडचे सुब्रमण्यम एम आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

गोव्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, मुख्यमंत्री या नात्याने संरक्षण क्षेत्रातील पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया व्हिजनला आत्मनिर्भर करण्याच्या अनुषंगाने देशातील पहिले स्वदेशी सोनार डोमचे उदघाटन करणे माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. सर्व गोवेकरांसाठीही हा अभिमानाचा क्षण आहे की भारतीय नौदलासाठी भारतीय युद्धनौकेचा एक महत्त्वाचा घटक देशाच्या प्रथम सोनार डोमच्या पुरवठ्यासाठी गोव्यातील कंपनीने नामांकित केले आहे. तत्कालीन रक्षामंत्री स्व.श्री मनोहर पर्रीकर यांनी हा प्रकल्प सुरू करण्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

या प्रसंगी कायनेकोचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर सरदेसाई म्हणाले, भारताचा पहिला स्वदेशी सोनार डोम प्रकल्पाचा भाग होण्याचा बहुमान आणि त्यातील यशासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल संपूर्ण टीम कायनेको अतिशय आनंदी आहे. आर अँड डी इंजिनियर्स (डीआरडीओ) आणि मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि भारतीय नौदलाचे आम्ही आभारी आहोत कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे विलक्षण यश शक्य झाले नसते. संरक्षण क्षेत्रात आम्ही भविष्यातही सदैव कार्यरत राहणार असून आम्ही आमचे योगदान देतच राहू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT