Kartik Kudnekar and Suvarna Tendulkar have been elected unopposed North Goa and South Goa ZP Chairperson
Kartik Kudnekar and Suvarna Tendulkar have been elected unopposed North Goa and South Goa ZP Chairperson 
गोवा

गोवा ब्रेकिंग : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षपदी कार्तिक कुडणेकरांची बिनविरोध निवड

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी : उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने कार्तिक कुडणेकर यांची अध्यक्षपदी तर दिक्षा कांदोळकर यांची उपाध्क्षपदी बिनविरोध निवड झाली. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तथा निवडणूक अधिकारी पि पी मुरगावकर यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी त्यांनी पंचायतीच्या विकासकामाच्या प्रक्रियेसंदर्भात तसेच जिल्हा पंचायतीकडे विकासकामांवर खर्चासाठी असलेल्या निधीची माहिती दिली.

उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी कार्तिक कुडणेकर तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी सुवर्णा तेंडुलकर यांचे नाव भाजपने निश्चित केलं होतं. पक्षीय पातळीवर ही निवडणूक झाली होती. भाजपने दोन्ही जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये निर्विवाद बहुमत मिळवले आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पदासाठी दीक्षा कांदोळकर तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पदासाठी खुशाली वेळीप यांचं नाव पक्षाने निश्चित केले होतं. जिल्हा पंचायत सदस्य, गाभा समिती आणि नेत्यांशी चर्चा केल्यानंतर ही नाव निश्चिती करण्यात आली आहे.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: सहा लाखांचा माल जळून खाक; मोलेत बर्निंग ट्रकचा थरार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

Margao District Hospitals : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करणार : विरियातोंचे आश्वासन

SCROLL FOR NEXT