Kalyan Ashram and Mahila Mandal Dainik Gomantak
गोवा

Rani Durgawati: 'राणी दुर्गावती' पराक्रमाच्या प्रतीक! 500व्या जयंतीनिमित्त नारीशक्ती दिवस साजरा

Rani Durgawati 500th Birth Anniversary: राणी दुर्गावती यांनी आपण दुर्गा असल्याचे सिद्ध केले. दुर्गा या नावाप्रमाणेच आम्हाला त्यांचा पराक्रम दिसून येतो, असे कल्याण आश्रमचे अध्यक्ष दत्ता नायक यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्‍टी: महिलेने ठरविले तर ती काय करू शकते, त्याचे मोठे उदाहरण म्हणजे राणी दुर्गावती. इतिहास लिहिताना असेच सांगितले आहे की, महिला घाबरून लपून बसत होत्या. त्यामुळे त्या अबला ठरत होत्या. मात्र, राणी दुर्गावती यांनी आपण दुर्गा असल्याचे सिद्ध केले. दुर्गा या नावाप्रमाणेच आम्हाला त्यांचा पराक्रम दिसून येतो, असे कल्याण आश्रमचे अध्यक्ष दत्ता नायक यांनी सांगितले.

कल्याण आश्रम व महिला मंडळ, मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गोंड राणी दुर्गावती यांच्या ५०० व्या जयंतीनिमित्त नारीशक्ती दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दत्ता नायक हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम कोंब येथील श्री दामोदर विद्याभुवनात झाला. यावेळी लोविना सुरेश नारंग, कल्याण आश्रमचे डॉ. गावडे व महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.

राणी दुर्गावती या पराक्रमाचे मोठे प्रतीक आहे, ज्याप्रमाणे महाराणा प्रताप यांच्या जीवनात ‘चेतक’ नावाच्या घोड्याला खूप महत्त्व आहे, त्याचप्रमाणे राणी दुर्गावती यांच्या जीवनात त्यांच्या ‘समरन’ नावाच्या पांढरा हत्तीला खूप महत्त्व आहे. त्या हत्तीने मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव आपल्या पोटाखाली लपवून ठेवले. कारण त्यांचे पार्थिव शत्रूच्या हाती पडले असते, तर त्याची विटंबना झाली असती, याची त्या मुक्या प्राण्याला देखील कल्पना होती. असा आमचा इतिहास असून, हा इतिहास कधीच विसरू नये.

पाचशे वर्षांनंतरही त्यांच्या महान पराक्रमाच्या आठवणी नारीशक्ती दिनाच्या निमित्ताने जागवण्यात येत आहेत. कारण या देशाच्या इतिहासात स्वाभिमान खूप महत्त्वाचा असून, त्याचा पराभव कधीच झालेला नाही, असे नायक म्हणाले.

आम्ही चीनलाही पुरून उरलो

आमच्यावर जे आक्रमण करतात, त्यांच्याकडे आमच्यापेक्षा उत्तम शस्त्रे असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. १९६५ आणि १९७१ मध्ये आम्ही पाकिस्तानचा पराभव केला. तो पाकिस्तानचा नव्हे, तर अमेरिकेचा पराभव होता. कारण अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रे पुरविली होती. ती शस्त्रे उत्कृष्ट दर्जाची असून देखील निरूपयोगी ठरली. कारण पराक्रमाच्या बळावर चीनलाही आम्ही पुरून उरलो, असे नायक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT