Kalutsav Was celebrated with enthusiasm
Kalutsav Was celebrated with enthusiasm 
गोवा

मयेतील कळसोत्सव पोलिस बंदोबस्तात साजरा

गोमन्तक वृत्तसेवा

डिचोली: समस्त मयेवासीयांचे त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील भाविकांचे लक्ष लागून राहिलेला मये येथील श्री माया केळबाय देवस्थानचा कळसोत्सव आज (शनिवारी) पोलिस बंदोबस्तात आणि असंख्य भक्‍तगणांच्या साक्षीत निर्विघ्नपणे उत्साहात साजरा करण्यात आला. कळसोत्सवाचा आज शेवटचा दिवस असल्याने एकाच दिवसात कळसोत्सव साजरा करण्याचा पर्याय देवस्थान समितीसमोर होता. त्यामुळे देवीचा कलश घरोघरी नेणे आदी काही पारंपरिक धार्मिक कृत्यांना फाटा द्यावा लागला. मात्र, उपस्थित शेकडो भाविकांना गावकरवाडा येथील श्री महामाया मंदिरात देवीचा कौल घेण्याची संधी मिळाली.

मान व अधिकाराच्या मुद्यावरुन कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरुन गेल्यावर्षी मयेतील कळसोत्सव आणि नंतर माल्याची जत्रा आदी प्रमुख उत्सव निलंबित करण्यात आली होते. यंदाही कळसोत्सवावरुन वाद निर्माण झाला होता. मात्र, देवस्थान समितीच्या सहकार्यातून कळसोत्सव साजरा करावा, असा आदेश देवालयांचे प्रशासक तथा डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी गेल्या २१ फेब्रुवारी रोजी दिला होता.

मात्र, नंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता गृहीत धरुन ऐन कळसोत्सवाच्या दिवशी म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी सकाळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळसोत्सव निलंबित करण्याचा आदेश दिला. त्यामुळे ठरलेल्या दिवशी कळसोत्सव साजरा करण्यात आला नाही. मागाहून गेल्या ३ मार्च रोजी कळसोत्सव साजरा करण्याबाबतीत उच्च न्यायालयाने परब समाजाला मोकळीक दिल्याने, कळसोत्सव साजरा करण्याबाबतीत हालचाली सुरू झाल्या. श्री माया केळबाय देवस्थानशी संलग्न देवस्थानच्या चौगुले मानकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आज शनिवारी एकाच दिवसात कळसोत्सव साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला होता.

त्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी श्री महामाया मंदिरात देवीचा कलश फुलांच्या गजऱ्यांनी सजविण्यात आला. नंतर ४.३० वा. कलश सभामंडपात आणून गाड कुटुंबियांतील मोडाच्या डोक्‍यावर ठेवण्यात आला. घाडीतर्फे गाऱ्हाणे घातल्यानंतर अवसारी मोडासहीत वाजतगाजत देवीच्या कलशाचे श्री केळबाय मंदिराकडे प्रस्थान झाले. केळबाय मंदिरात पूजाअर्चा आदी पारंपरिक धिार्मिक विधी पार पडल्यानंतर कलशाचे श्री सातेरी मंदिरात प्रस्थान झाले. त्याठिकाणी धार्मिक कृत्ये झाल्यांनतर कलशाचे पुन:च्छ श्री महामाया मंदिरात आगमन झाले. त्याठिकाणी भाविकांना कौल देवून कळसोत्सवाची कोणत्याही अडथळ्याविना उत्साहात सांगता झाली.

मयेत छावणीचे स्वरुप !

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कळसोत्सवावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये, त्यासाठी सरकारी यंत्रणाही सज्ज झाली होती. कळसोत्सवावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी देवस्थान समितीने देवालयांचे प्रशासक तथा डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्याकडे केल्यानंतर उत्सव काळात सशस्त्र पोलिसांसह पोलिस तैनात करावेत, असे निर्देश मामलेदार पंडित यांनी डिचोली पोलिसांना दिले होते. त्यानुसार कळसोत्सव काळात मये गावात पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली होती. श्री महामाया आणि श्री केळबाय मंदिर परिससरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

त्यामुळे मये गावात पोलिस छावणीचे दृष्य दिसून येत होते. देवालयांचे प्रशासक तथा मामलेदार प्रवीणजय पंडित हे कळसोत्सवावेळी जातीने हजर होते. डिचोलीचे पोलिस निरीक्षक संजय दळवी आणि वाळपईचे पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. कळसोत्सवावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला नाही. देवस्थान समिती आणि भाविकांच्या सहकार्यातून हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा झाला, अशी माहिती मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT