Shripad Naik
Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

आंतरराष्ट्रीय योग दिन ऐतिहासिक स्थळावर : श्रीपाद नाईक

दैनिक गोमन्तक

पणजी : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी राज्यातील दोन ठिकाणे निश्‍चित केली आहेत. जुने गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च परिसर आणि आग्वाद किल्ला याठिकाणी योग दिन साजरा होणार आहेत.

जुने गोवा येथे आपण आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांची किल्यावर उपस्थिती राहील, अशी माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

गोवा राज्य योग अकादमीचे मिलिंद महाले, इंडिया टुरिझमचे प्रादेशिक संचालक डी. व्यंकटेशन, समन्वयक सूरज नाईक, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे सहसंचालक विनोद कुमार यांची उपस्थिती होती.

नाईक म्हणाले, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अतुल्य भारताचा ब्रँड करण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी यावर्षी देशभरातील ७५ प्रतिष्ठित पर्यटन स्थळे निश्‍चित केली आहेत. या वर्षीची थीम ''मानवतेसाठी योग'' अशी आहे.

ते पुढे म्हणाले, गोवा राज्य योग अकादमी, जिल्हा पंचायती, स्थानिक ग्रामपंचायती, क्षेत्र तपोभूमी, नेहरू युवा केंद्र, विद्या प्रबोधिनी महाविद्यालय, लायन्स क्लब, रोटरी क्लब, सम्राट क्लब, मुरगाव पोर्ट ट्रस्टचे अधिकारी व कर्मचारी, विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी या उत्सवात सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात अंदाजे 800 ते 1000 जणांचा सहभाग राहील.

असा आहे कार्यक्रम

  • पहाटे 5.30 ते 6.00 विधानसभा

  • स. 6 ते 6.40 स्वागत कार्यक्रम, तसेच पर्यटन, शिपिंग, बंदरे आणि जलमार्ग येथे मान्यवरांचे भाषण

  • स. 6.40 ते 7.00 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन

  • स. 7.00 ते 7.45 योगासने

  • स.7.46 वा. राष्ट्रगीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

SCROLL FOR NEXT