Accident  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील 'त्या' ट्रेन अपघाताची चौकशी सुरू

रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दूधसागर स्थानकातून गाडी सुटल्यानंतर सकाळी 8.56 च्या सुमारास लोकोमोटिव्ह इंजिनची पुढची चाके रुळावरून घसरली.

दैनिक गोमन्तक

पणजी: दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) ने मंगळवारी झालेल्या वास्को-हावडा अमरावती एक्सप्रेस ट्रेनच्या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. या अपघातात मंगळवारी सकाळी 8.56 वाजता वास्को हावडा अमरावती एक्सप्रेस (Vasco-Da-Gama Howrah Amaravati Express) दूधसागर आणि करंजोल स्थानकांच्या दरम्यान रुळावरून घसरली होती. (Train Accident in Goa Latest News)

रेल्वे (Railway) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दूधसागर स्थानकातून गाडी सुटल्यानंतर सकाळी 8.56 च्या सुमारास लोकोमोटिव्ह इंजिनची पुढची चाके रुळावरून घसरली.
SWR महाव्यवस्थापक संजीव किशोर आणि त्यांच्या पथकाने अपघातस्थळी धाव घेतली आणि पाहणी केली.

"ट्रेन घसरण्याचे मूळ कारण शोधले जाईल आणि हे परत होऊ नये म्हणून आवश्यक उपाय केले जातील," असे किशोर म्हणाले. त्यांनी ट्रेन क्रमांक 12779 वास्को-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसच्या गार्ड ब्रेक व्हॅनचीही पाहणी केली आणि ट्रेन मॅनेजरशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले,
जलद कारवाईमुळे, आम्ही थोड्याच वेळात परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रवाशांसाठी (Passengers) जेवणसाहित ईतर सर्व व्यवस्था जलदगतीने करण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT