Indore Double Murder Case Goa Connection Dainik Gomantak
गोवा

आईने दार उघडले नाही म्हणून वाचली; वडील आणि बहिणीची हत्या करुन गोव्यात लपलेल्या आरोपीचे ठिकाण सापडले

Pramod Yadav

Indore Double Murder Case Goa Connection: संयोगिता गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी गोव्यात लपून बसला होता. पोलिसांनी गोवा गुन्हे शाखेशी संपर्क साधून आरोपीचा फोटो पाठवल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यास मदत झाली.

पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लग्न ठरत नसल्याने रागाच्या भरात आरोपीने वडील आणि बहिणीची हत्या केली. त्यानंतर तो 48 तास दोघांच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. आरोपी काही दिवसांपूर्वी व्यसनमुक्ती केंद्रातून आपल्या घरी परतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नौलाखा भागातील वसुधैव कुटुंबकम अपार्टमेंटमध्ये सेवानिवृत्त बँक मॅनेजर आणि त्यांच्या मुलीची हत्या झाल्याची माहिती संयोगितागंज पोलिसांना 8 नोव्हेंबर रोजी मिळाली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, एसबीआयमधून निवृत्त झालेले कमल किशोर धामांडे (76) आणि त्यांची मुलगी रमा अरोरा (53) यांचे मृतदेह बंद फ्लॅटमध्ये आढळून आले. मृताचा मुलगा पुलकित याने या हत्या केल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. तेव्हापासून तो बेपत्ता आहे.

वडील आणि बहिणीची हत्या केल्यानंतर आरोपी सिलिकॉन सिटीमध्ये आईच्या घरीही पोहोचला होता. मात्र आईने दरवाजा न उघडल्याने ती वाचली. आईलाही मारण्याच्या उद्देशाने आरोपी तेथे पोहोचल्याचे समजते. हत्येनंतर आरोपी वडिलांचे एटीएम घेऊन इंदूरहून पळून गेला होता.

आरोपीचे पहिले लोकेशन गुजरातमधील वडोदरा येथे आढळून आले, जिथे त्याने एटीएममधून काही पैसे काढले होते. बँकेकडून पुष्टी मिळताच पोलीस वडोदरा येथे पोहोचले, मात्र तेथूनही आरोपी फरार झाला. त्यानंतर आता पोलिसांना आरोपीचे गोव्यातील लोकेशन सापडले आहे.

आरोपी पुलकित काही दिवसांपूर्वी व्यसनमुक्ती केंद्रातून परतला होता. रहिवाशांनी सांगितले की त्याचे वागणे काहीसे विचित्र होते आणि तो मानसिक आजाराने ग्रस्त होता, त्यामुळे तो कोणाशीही जास्त बोलत नव्हता. पोलिस लवकरच आरोपीला अटक करतील, असे सांगण्यात येत आहे.

घटनेनंतर आरोपी अ‍ॅक्टिव्हा गाडीतून पळून गेल्याचे सांगण्यात आले, परंतु आरोपीच्या वाहनाचा नंबर कुटुंबीय व शेजाऱ्यांना सापडला नाही. पोलिसांनी अपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या वॉचमनचीही चौकशी केली. मानसिक विकाराने त्रस्त असलेला मुलगा पुलकित सध्या फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT