Indian International Film Festival Goa will be held from January 16 to 21, 2021
Indian International Film Festival Goa will be held from January 16 to 21, 2021 
गोवा

‘फिल्म बझार’ही आभासी पद्धतीने

प्रतिनिधी

पणजी: दरवर्षी गोव्यात पार पडणारा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा आता १६ ते २१ जानेवारी, २०२१ या कालावधीत होणार आहे. यावर्षीचा  इफ्फी प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीने होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने दिली आहे. तसेच यावर्षीचा फिल्म बझारही आभासी तसेच प्रत्यक्ष पद्धतीने होणार असल्याची माहिती मिळाली. 
 
गोवा मनोरंजन संस्थेतून मिळालेल्या माहितीनुसार, इफ्फी संदर्भात सुकाणू समितीची प्रथम व्हर्च्युअल बैठक ऑगस्ट महिन्यात झाली होती. या पहिल्या बैठकीत इफ्फीचे आयोजन करावे की नाही, यावर चर्चा झाली होती. या बैठकीत, इफ्फीच्या आयोजनात खंड पडू नये आणि आयोजन व्हावे, परंतु ते मोठ्या प्रमाणात होऊ नये, अशा आशयाची चर्चा झाली होती. गोवा मनोरंजन संस्था आता लवकरच इफ्फीच्या कामाची लगबग सुरू करेल, अशी माहितीही मिळाली आहे.  

हे वर्ष फिल्म बझारचे १४ वे वर्ष असणार आहे. माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या सहसचिव टी.सी.ए कल्याणी यांनी राष्ट्रीय माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या महामारीमुळे ज्याप्रमाणे इफ्फी पुढे ढकलण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फिल्म बझारही इफ्फीसोबत पार पडणार आहे. यापूर्वी आम्ही आभासी पद्धतीने करण्याचे ठरविले होते. मात्र आता इफ्फी सोबतच आभासी आणि प्रत्यक्ष असा दोन्ही पद्धतीने फिल्म बझार होणार आहे. आभासी पद्धतीने फिल्म बझार होणार असल्याने यावर्षी जागतिक सिनेप्रेमी आणि ज्यांना चित्रपट निर्मितीमध्ये अधिक आवड आहे, अशा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचता येणार आहे.

दरम्यान, यंदा इफ्फी काही प्रमाणात व्हर्च्युअल तसेच प्रत्यक्ष ठिकाणांवर होणार असून महोत्सवात ७ अधिकृत विभाग (ऑफिशीअल सॅक्शन) असतील, अशीही माहिती मिळाली आहे. इफ्फीत कोणते देश, प्रतिनिधी सहभागी होतील, इफ्फीचा उद्‍घाटन व समारोप सोहळा या संदर्भातील माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT