Vijay Sardesai
Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : बंधारे बांधून म्हादई पाणी वळविण्याचे कर्नाटकचे प्रयत्न ताबडतोब हाणून पाडा

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : म्हादईच्या खोऱ्यात कर्नाटक सरकार लहान बंधारे बांधून आता पाणी वळविण्याचा डाव खेळत आहे. गोवा सरकारने या विरोधात त्वरित पाऊले उचलून हे प्रयत्न हाणून पाडावेत अशी मागणी करणारे पत्र गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे.

पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी कर्नाटकचा डाव उघड पाडला होता. याची दखल घेताना सरदेसाई यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात सरकारने म्हादईच्या खोऱ्यात जाऊन त्वरित तपासणी करावी आणि कर्नाटकचे हे कारस्थान सर्वोच्च न्यायालय आणि म्हादई पाणी तंटा लवाद यांच्यासमोर नेऊन कर्नाटक न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत असल्याचे पटवून द्यावे अशी मागणी केली आहे.

दरम्यान सरदेसाई यांनी एका व्हिडिओ संदेशातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आवाहन करताना, जर म्हादई तुमची खरीच आई असल्यास तिचा गळा घोटण्या पासून कर्नाटकला परावृत्त करा अशी मागणी केली आहे.

2023 मध्ये कर्नाटक राज्यात निवडणूक असल्याने त्यांना म्हादई बाबत हवे करू देण्याची मोकळीक देऊ नका. म्हादई कर्नाटकला विकून टाकू नका असे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

SCROLL FOR NEXT