I League 2 Dainik Gomantak
गोवा

I-League 2 Football: स्पोर्टिंग क्लब गोवाला पराभवाचा धक्का

किशोर पेटकर

I-League 2 Football: आय-लीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्यास इच्छुक असलेल्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाला बुधवारी पराभवाचा धक्का बसला. एफसी बंगळूर युनायटेडने त्यांना आय-लीग 2 स्पर्धेत 1-0 फरकाने निसटते हरविले.

बंगळूर येथे सामना झाला. लढतीतील निर्णायक गोल न्गंगबम नाओचा सिंग याने 23 व्या मिनिटास केला. बंगळूर युनायटेडचा हा सलग तिसरा विजय ठरला असून त्यांचे नऊ गुण झाले आहेत.

यापूर्वी त्यांनी केंकरे एफसीला 4-2 असे, तर धेंपो स्पोर्टस क्लबला 1-0 असे नमविले होते. सुदेवा दिल्लीविरुद्ध 1-1 अशी बरोबरी, नंतर केंकरे एफसीवर 2-1 असा विजय नोंदविलेल्या स्पोर्टिंग क्लबचे या पराभवामुळे चार गुण कायम राहिले.

स्पर्धेतील आणखी एका सामन्यात केंकरे एफसीने पहिल्या विजयाची नोंद करताना युनायटेड स्पोर्टस क्लबला 2-0 फरकाने हरविले.

धेंपो क्लबचा सामना:-

आय-लीग 2 स्पर्धेत धेंपो स्पोर्टस क्लबचा घरच्या मैदानावर सामना गुरुवारी (ता. १) खेळला जाईल. त्यांच्यासमोर स्पोर्टिंग क्लब बंगळूरचे आव्हान असेल. सध्या स्पोर्टिंग क्लब बंगळूरचे तीन, तर धेंपो क्लबचा एक गुण आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT