Huge fire broke out in commercial building in Margao
Huge fire broke out in commercial building in Margao  Dainik Gomantak
गोवा

मडगावात व्यवसायिक इमारतीमध्ये अग्‍नितांडव

दैनिक गोमन्तक

सासष्टी: मडगाव(margao) येथील आताफोंत उद्यानाजवळील व्यवसायिक इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागून 1. 35 लाखांचे नुकसान झाले. तीन कपड्यांची दुकाने, गारमेंट स्टोअर रुम, ख्रिसमस सजावटीचे दुकान जाळून खाक झाले. अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराच्या लोट तयार झाले होते. तर, यात दोघेजण किरकोळ जखमी झाले. अग्‍निशामक दलाने सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.

मडगाव येथील व्यावसायिक इमारतीमधील तळमजला व पहिल्या मजल्यावरील दुकानांना सोमवारी उत्तररात्री 2.22 वा.च्‍या सुमारास आग लागली. या इमारतीत हॉटेल, सभागृह तसेच अन्य दुकाने होती. आग लागल्याने शैलेश मिश्रा यांचा मालकीचे रोहित कलेक्शन, अशफाक हुसैन यांच्या मालकीचे जास्‍मिन गारमेंट, रॉशन रावल यांच्या मालकीचे अनिशा गारमेंट, एक कपडे ठेवलेला स्टोअर रुम आणि मेनिकम यांच्या मालकीच्या ख्रिसमस सजावटीच्‍या दुकानाला लाग लागली. आग लागल्याने लगत असलेली पाचही दुकाने पूर्णपणे आगीत भस्मसात झाली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप कळालेले नसून वीज विभाग व पोलिसांकडून अहवाल मिळाल्यावर आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, असे अग्‍निशामक दलाने सांगितले.

46 पर्यटकांना वाचविले या व्यवसायिक इमारतीमध्‍ये श्री दामोदर हॉटेल तसेच तळवलीकर सभागृह आहे. आग लागल्याची माहिती मडगाव पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्वरित हॉटेलमध्ये राहणाऱ्या पर्यटकांसह एकूण ४६ जणांना बाहेर काढले. यात रवी रमण आणि विकास कुमार हे दोन पर्यटक किरकोळ जखमी झाले. त्यांना जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. चार बंबांद्वारे आग विझवली आग विझविण्यासाठी अग्‍निशामक दलाला चार बंब लागले. कपड्याचे साहित्य तसेच प्लास्टिकच्या वस्तू असल्यामुळे आगीची तीव्रता व धुराच्या प्रचंड ज्वाला हवेत पसरल्याने आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत होते. आग विझविण्‍यासाठी वेर्णा, मडगाव, फोंडा, सावर्डे आदी ठिकाणांहून बंब मागविण्‍यात आले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजले नाही. तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

सोन्या-चांदीने रचला मोठा रेकॉर्ड; सोन्याने पार केला 74 हजारांचा टप्पा!

हिंदुजा बनले ब्रिटनमधील सर्वात ‘श्रीमंत व्यक्ती’, इराणसोबत 60 वर्षे केला व्यवसाय; भारतातही ग्रुपचा मोठा विस्तार!

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT