Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी!

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin: शांतादुर्गा प्रकरणानंतर लईराईच्या धोंड भक्तगणांबद्धल आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी श्रेया विरोधात आणखी एक तक्रार दाखल.
Lairai Devi
Lairai DeviDainik Gomantak

Derogatory Comment on Shantadurga Kunkalikarin

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान व महाजनांसंदर्भात समाज माध्यमांत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप असलेल्या श्रेया धारगळकर, नमिता फातर्फेकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

श्रेया आणि नमिता केपे प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता हा निर्णय देण्यात आला आहे.

श्रेया धारगळकरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी दुपारनंतर असंख्‍य संतप्‍त भाविकांनी तिच्या अटकेची मागणी करत कुंकळ्ळी पोलिस ठाण्‍यावर मोर्चा नेला. पोलिसांनी श्रेयासह नमिताला अटक केल्यानंतर तिने जाहीर माफी देखील मागितली.

दरम्यान, आज दोघींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आणखी एक गुन्हा नोंद

एका प्रकरणात अटकेत असताना श्रेया विरोधात शिरगावच्या श्री लईराईच्या धोंड भक्तगणांबद्धल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी डिचोली पोलिसात तक्रार करण्यात आलीय. भाविकांनी श्रेयाच्या अटकेची मागणी केली आहे. संतप्त धोंड भक्तगणांची पोलिस स्थानकावर धडक देत तक्रार दाखल केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com