Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: चुलीच्या आगीत घराने घेतला पेट; अडकून पडलेल्या दोन चिमुरड्यांना स्थानिकांमुळे मिळाले जीवदान

Sao Jose de Areal: सां जुझे द अरियल या गावातील स्थानिकांनी घराला लागलेल्या भीषण आगीमधून दोन लहान मुलांचा जीव वाचवला.

गोमन्तक डिजिटल टीम

Sao Jose de Areal

मडगाव: सासष्टी तालुक्यातील मुंगळी, सां जुझे द अरियल या गावातील एका घराला लागलेल्या भीषण अगीमधून दोन लहान मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुलांना वाचविण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातून येणारा धूर पाहताच स्थानिकांनी मदतीसाठी घराकडे धाव घेतली. दरवाजा तोडत घरात आगीत अडकलेल्या ५ आणि ६ वर्षांच्या दोन लहानग्यांची सुखरूप सुटका केली, मात्र हा संपूर्ण प्रकार घडत असताना कुटुंबातील इतर मंडळी घरात उपस्थित नव्हती.

अग्निशामक दलाच्या मदतीने ही आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. दरम्यान, घराला लागलेल्या या आगीत अत्यावश्यक वस्तू जळाल्यामुळे घरमालकाचा १ लाख किंवा अधिक रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

घरासमोरच्या भागात पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवली होती. चुलीसाठी पेटवलेल्या आगीची ठिणगी घराच्या दिशेने आल्याने घराने पेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. घराचे बांधकाम सुरु असल्यामुळे भांडी आणि इतर वस्तू बाहेरच्या भागात हलवण्यात आल्या होत्या आणि भीषण आगीमुळे या सगळ्या वस्तू जळून जागीच खाक झाल्या असल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गिल दासां यांनी माध्यमांना दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT