Hospicio Margao hospital Dainik Gomantak
गोवा

Goa: '..बेड्स नाकारले, उद्धटपणे वागले'! हॉस्‍पिसियोत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; कुटुंबीयांचे व्यवस्थापनावर आरोप

Hospicio Margao hospital: दक्षिण गोव्‍याचे जिल्‍हा इस्‍पितळ असलेल्‍या हॉस्‍पिसियो इस्‍पितळात खाट नसल्‍याचे सांगून एका ज्‍येष्‍ठ नागरिकाला ॲडमिट करून घेण्‍यास नकार दिल्‍यानंतर त्‍याला खासगी इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले.

Sameer Panditrao

मडगाव: दक्षिण गोव्‍याचे जिल्‍हा इस्‍पितळ असलेल्‍या हॉस्‍पिसियो इस्‍पितळात खाट नसल्‍याचे सांगून एका ज्‍येष्‍ठ नागरिकाला ॲडमिट करून घेण्‍यास नकार दिल्‍यानंतर त्‍याला खासगी इस्‍पितळात दाखल करण्‍यात आले. मात्र तिथे त्‍याची प्रकृती आणखी ढासळल्‍याने त्‍याला पुन्‍हा हॉस्‍पिसियोत आणण्‍यात आले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या रुग्‍णावर वेळीच योग्‍य ते उपचार न झाल्‍याने त्‍याला आपले प्राण गमवावे लागले.

या घटनेमुळे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून या इस्पितळातील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्याच्या अनास्थेमुळे या ६९ वर्षीय रुग्णाला आपला जीव गमवावा लागला असा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे. संबंधितांनी यासंबंधी फातोर्डा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यात डॉक्टर व अन्य कामगारांनी रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली. वेळीच त्यांच्यावर उपचार न झाल्याने त्यांना मरण आले असा आरोप करून, संबंधितांवर कारवाई करण्‍याची मागणी केली आहे.

सिने लता जवळ राहणारे जगदीश जामुनी (६९) असे या मयताचे नाव असून प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले असता खाट उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून त्यांना अॅडमिट करून घेण्यास नकार देण्यात आला.

नंतर त्यांना एका खासगी इस्पितळात दाखल केले, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा या शासकीय इस्पितळात नेले असता, त्यावेळीही खाट उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. दुसऱ्या दिवशी खाट उपलब्ध करून दिली पण ऑक्सिजनचा पुरवठाही केला नाही. रुग्णाची प्रकृती चिंताजनक असतानाही मुख्य डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली नाही. परिचारिका व अन्य कर्मचारीही त्‍यांच्‍याशी उद्धटपणे वागले, असा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

फातोर्डा पोलिसांशी संपर्क साधला असता, तक्रार आली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी याच इस्पितळात खाटा उपलब्ध नसल्याने अन्नातून विषबाधा झालेल्या युवतीला खासगी इस्पितळात उपचार घ्यावे लागल्याची घटना घडली होती. अशा घटनेची नेहमीच पुनरावृत्ती होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India's 2nd Biggest Stadium: देशातील दुसरं सर्वात मोठं स्टेडियम उभारलं जाणार; खर्च तब्बल 1650 कोटी, सरकारने केली घोषणा

Goa Assembly 2025: आता गोवा बनणार 'बीच स्पोर्ट्स टूरिझम हब'! सरकारची नवी योजना

Operation Sindoor: S-400 चा दणका! पाकिस्तानची 5 फायटर प्लेन पाडली; एअर चीफ मार्शल एपी सिंग यांचा खुलासा, Watch Video

Train Ticket Discount: सणासुदीचा प्रवास होणार स्वस्त, रेल्वेकडून 'राउंड ट्रिप पॅकेज'; वाचा नेमकी योजना काय?

Weekly Horoscope: प्रेम, व्यवसायात शुभ योग! कसा असेल पुढचा आठवडा? जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT