High Court of Bombay in Goa
High Court of Bombay in Goa Dainik Gomantak
गोवा

Panaji News : पणजीतील वाहतूक कोंडी; स्पष्टीकरणासह प्रतिज्ञापत्र द्या

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : राजधानी पणजीतील होणारी वाहतुकीची कोंडी तसेच वाहतूक व्यवस्थापनातील गलथानपणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेतलेल्या स्वेच्छा याचिकेत वाहतूक सचिवांना नोडल अधिकारी नेमून वाहतुकीच्या कोंडीमागील स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावरील सुनावणी पुढील महिन्यात 14 जुलै 2023 रोजी ठेवली आहे. पणजीतील दिवजा सर्कलजवळ उभारण्यात येत असलेल्या सांता मोनिका जेटीजवळ तसेच मांडवी किनारी भागातील रस्त्यांवर वाहने पार्किंग केली जात असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे.

यासंदर्भात गोवा खंडपीठाने दोन महिन्यापूर्वी गंभीर दखल घेतली होती. वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक समस्या उद्‍भवत असताना वाहतूक व्यवस्थापनाबाबत कोणतीच पावले उचलण्यात आली नव्हती. गोवा खंडपीठाने यासंदर्भात वाहतूक, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम खाते, पणजी महापालिका तसेच स्मार्ट सिटी कंपनीला प्रतिवादी करून नोटिसा बजावल्या होत्या.

मांडवी तिरावर बेशिस्त पार्किंग

पणजी फेरीबोट धक्का ते मांडवीच्या तिरावर असलेल्या कसिनो कार्यालयामुळे तेथील ‘नो पार्किंग’ भागात वाहने उभी केली जात आहेत. त्याचा परिणाम शहरातील सुरळीत वाहतुकीवर होतो. सांता मोनिका येथे मल्टीलेव्हल पार्किंग इमारत असूनही त्याचा वापर पूर्णपणे होत नाही. भविष्यात ही समस्या दिवसेंदिवस अधिक जटील होण्याची शक्यता असल्याने त्यावर वेळीच पर्याय काढण्याची गरज असताना सरकारकडून दुर्लक्ष झाल्याने खंडपीठाने त्यात हस्तक्षेप करत दखल घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT