corona possitive
corona possitive 
गोवा

कोरोनाबाधितांचा उच्चांक, २४ तासांत १९८ रुग्‍ण पॉझिटिव्‍ह

Tejshri Kumbhar

तेजश्री कुंभार

पणजी :

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढतच आहे. बुधवारी पॉझिटिव्‍ह रुग्‍णांचा उच्चांक गाठला असून २४ तासांत १९८ रुग्‍ण सापडले, तर ६७ रुग्णांची प्रकृती सुधारली. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १२५९ पर्यंत पोहोचली आहे.
बुधवारी ५ आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आणि १० देशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले. हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये २८ जणांना ठेवण्यात आले असून सध्या हॉस्पिटल आयसोलेशनमध्ये २८ जण आहेत. २५४२जनांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले, तर २५७२ जणांचे अहवाल हाती आले असून यातील ३४९२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
आरोग्य खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार रस्ता, रेल्‍वे आणि विमानमार्गे आलेल्या १२९ रुग्णांचा या यादीत समावेश आहे. मांगोरहिल येथील ७८ रुग्ण, मांगोरहिल परिसराशी संबंधित ४०८ रुग्ण, मडगावात १६, केपेत १७, लोटलीत २६, नावेलीत ९, गंगानगर म्हापसा येथे ७, साखळीत २५, कामराभाट टोंका १, साखळीत २५, काणकोणात ६, फातोर्डा येथे १, शंकरवाडीत १, राय येथे ३, मोतिडोंगर येथे ७, फोंड्यात ४९, वाळपईत १९, माशेलात २, उसगावात ८, डिचोलीत ८, शिरोड्यात १८, पेडणेत १२, पिलार येथे ३, गोवा वेल्हा येथे ४, सांगे ४, मंडूर येथे १३, पर्वरीत ३, धारबांदोड्यात ११, नेरुल येथे २३, बाणावलीत ३, खांडोळा ४०, करासवाडा येथे ६, दोनपावला येथे २, नुवेत ४ रुग्ण आहेत. तसेच कुंडई, वेर्णा, कांदोळी, कोलवाळ, म्हार्दोळ, गिरी, कळंगुट, ताळगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण असून राज्यात इतर ठिकाणीही कोरोनाचे रुग्ण आहेत.


डॉ. आमोणकर यांचा
अहवाल निगेटिव्ह
माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर हे कोविड इस्पितळात दाखल केले होते. मात्र, त्यांच्या मृत्यूपूर्वी कोरोना पडताळणी तपासणीसाठी त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूनंतर ते कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल मिळाल्याची माहिती आज मिळाली. डॉ. आमोणकर यांचा मृत्यू ६ जुलै रोजी झाला होता आणि त्यापूर्वी त्यांच्या लाळेचे नमुने ५ जुलै रोजी घेण्यात आले होते. मात्र, त्यांच्या मृतदेहावर सावधगिरी बाळगत अंत्यसंस्कार केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Taliban: तेलाच्या खेळात तालिबान आजमावतोय हात; ‘या’ दोन देशांसोबत बनवली खास योजना!

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

SCROLL FOR NEXT