nivrutti1
nivrutti1 
गोवा

मोरजीत बालकलाकारांतर्फे गुरुपौर्णिमा

Dainik Gomantak

मोरजी :

जीवनात गुरुला अनन्यसाधारण महत्त्‍व आहे. जीवनात पहिला गुरु माता पिता आणि नंतर आपल्याला ज्ञान देणारे कलेचे गुरु. त्यांचे आज मोरजी गावडेवाडा येथे बालकलाकारांनी आपल्या गुरुजनांचे पूजन केले.
कोरोनाच्या संकटात शाळेला दीर्घ सुट्टी असल्‍याने विद्यार्थी सध्‍या कंटाळली आहेत. कोणतेही सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याने गावडेवाडा मोरजी येथील नाट्यकलाकार सुचिता शिरोडकर यांनी चार बालकलाकार एकत्रित करून गावातील बाल युवा पुरस्कार प्राप्त कलाकार वैष्णवी जोशी यांच्यामार्फत संस्कार आणि योगाचे धडे देण्यासाठी विनंती केली. चार पालकांनी संमती दाखवली आणि शाररीक अंतर सुरक्षित ठेवून संस्कार व योगासने याचे धडे देण्यास शिक्षिका वैष्णवी जोशी यांनी संमती दर्शवली. टाळेबंदीच्‍या काळात बालकलाकारांना धडे मिळू लागले. आज या चारही बालकलाकार मानसी शिरोडकर, आरल मोरजे, लेनोशा डिसिल्वा व आशी मोरजे या कलाकारांबरोबरच पालक सुचिता शिरोडकर, सीमा मोरजे, वेरोनिका डिसिल्वा व सागर मोरजे यांनी गुरुंचे पूजन केले. वैष्णवी जोशी यांनी बालकलाकाराना आजच्या दिनाचे महत्व पटवून सांगितले. गुरुजनांचा सदैव आदर सन्मान करायला शिका, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बालकलाकारांनी गुरुंचे महत्त्‍व सांगणारे नृत्य सादर केले. बालकलाकारांनी आपल्या गुरुला भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT