juze manual noronha
juze manual noronha 
गोवा

टाळेबंदीनंतर ‘जीपीएससी’तर्फे भरती

Dainik Gomantak

पणजी

कोविड टाळेबंदीनंतर गोवा लोकसेवा आयोग (जीपीएससी) मोठ्या प्रमाणावर अधिकारी भरती करणार आहे. २३३ पदांसाठी आयोगाने यापूर्वीच अर्ज मागवले होते आणि त्यासाठी साडेसहा हजार जणांनी अर्ज केले आहेत. ती पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी दिली.
ते म्हणाले, टाळेबंदीच्या काळात महाविद्यालयेही बंद राहिल्याने या परीक्षा घेता आल्या नाहीत. आता टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर या परीक्षा घेण्याचा आयोगाचा विचार आहे. कनिष्ठ अधिकारीपदाच्या २२ जागांसाठी ३ हजार ६०० अर्ज आले आहेत. त्यासाठीही परीक्षा घेतल्या जातील.
कृषी अधिकारी पदाच्या ९ जागांसाठी १२५ जणांनी अर्ज केले आहेत. गोवा दंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या २८ जागांसाठी २५० जणांनी, तर सहाय्यक प्राध्यापकांच्या ७५ जागांसाठी दीड हजार जणांनी अर्ज केले आहेत. अन्न व औषध प्रशासन खात्यातील कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदाच्या तीन जागांसाठी १२५ जणांनी अर्ज केले आहेत. या साऱ्यांच्या परीक्षा घेऊन मुलाखतीसाठी यादी तयार केली जाणार आहे, अशी माहिती देऊन ते म्हणाले, रेडिओलॉजिस्ट, न्युरोलॉजीतील सहाय्यक प्राध्यापकपदासाठी कोणीही अर्ज केलेला नाही. गोवा संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्यपदासाठीही अर्ज आलेला नाही. खाण खात्यातील भुगर्भ शास्त्रज्ञ पदाच्या २ जागांसाठी ३८ अर्ज आलेले आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्यपदासाठी ७० जणांनी अर्ज केला आहे.

दुसऱ्यांदा जाहिरात
देऊन मागवले अर्ज

शिक्षण खात्यातील सहाय्यक संचालकपदासाठी दुसऱ्यांचा जाहिरात देऊन अर्ज मागवावे लागले आहेत. पूर्वीच्या यादीतील उमेदवारांपैकी कोणीही मुलाखतीत या पदासाठी पात्र असल्याचे आढळून आले नाही, असे सांगून ते म्हणाले, २७ अर्ज आता त्यासाठी आलेले आहेत.

जानेवारी ते मार्चदरम्यान या पदांसाठी अर्ज मागवले होते. उच्च शिक्षण, नागरी हवाई वाहतूक, आरोग्य सेवा, दंत वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, खाण, कौशल्य विकास, पशुवैद्यकीय, कृषी आदी खात्यांत ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज केलेल्यांची संगणकावर आधारीत परीक्षा आयोग घेणार आहे.
-जुझे मान्युएल नरोन्हा, अध्‍यक्ष, गोवा लोकसेवा आयोग.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Goa Today's Live News Update: पणजी कधीच सोडणार नाही, अनेकांची स्वप्न ही स्वप्नच राहतील! मोन्सेरात

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

SCROLL FOR NEXT