पणजी, राज्यात यंदा ४ जून रोजी मान्सूनचे दबक्या पावलांनी आगमन झाले. आत्तापर्यंत ६४५.९ मि. मी. म्हणजेच २५.४२ इंच पावसाची नोंद झाली आहे. मात्र तरीसुद्धा सरासरी ८ टक्के पाऊस कमीच पडला आहे.
यंदा मान्सूनला वेळेत सुरूवात झाली असली तरी अजूनही पावसाने तसा जोर धरलेला नाही. राज्यात ऊनपावसाचा खेळ सुरू आहे. गोवा वेधशाळेने अनेकदा अंदाज वर्तवूनही चांगला पाऊस पडलेला नाही. परिणामी शेतीच्या कामांचा वेग काहीसा मंदावला आहे. राज्यात जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी पाहिल्यास उत्तर गोव्यात आत्तापर्यंत
७०९.१ मि.मी. (२७.९१ इंच) तर दक्षिण गोव्यात ६९६.९ मि.मी. (२७.३९ इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे.
उत्तरेत सरासरी पावसाच्या तुलनेत १६ टक्के तर दक्षिणेत -०.६ टक्के घट आहे. आत्तापर्यंत राज्यात सर्वाधिक ७७७.५ (३०.६१ इंच)पावसाची नोंद सांगेत झाली आहे. तर, सर्वांत कमी ४७६.८ (१८.७७ इंच) पाऊस फोंडा तालुक्यात पडला आहे.
आज जोरदार पावसाची शक्यता
उद्या मंगळवारी राज्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यासोबतच शापोरा ते पणजी आणि वास्को ते कोळंब भागातील समुद्रकिनाऱ्यांवर उद्या रात्री साडेअकराच्या सुमारास ३.२ ते ३.४ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून पश्चिमेकडून येणारे वारे मंदावले आहेत. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग तुलनात्मकदृष्ट्या वाढला आहे. त्यामुळे समुद्राकडून जमिनीकडे येणाऱ्या ढगांचे प्रमाण आणि वेग घटल्याने पाऊस मंदावला आहे. येत्या तीन-चार दिवसांत पाऊस पुन्हा जोर धरू शकतो.
- नहुष कुलकर्णी, संचालक (गोवा वेधशाळा)
आज जोरदार पावसाची शक्यता
उद्या मंगळवारी राज्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. किनाऱ्यांवर रात्री साडेअकराच्या सुमारास उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.