goa
goa Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update : पडझडीचे २५९ कॉल्स; १२.२७ लाखांचे नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Weather Update :

पणजी, राज्यात यावर्षी पावसाने विविध भागांमध्ये दमदार सुरवात केल्याने गेल्या १५ दिवसांमध्ये अनेक ठिकाणी झाडे पडण्याबरोबरच वीजवाहिन्या तुटल्याच्या अनेक घटना नोंद झाल्या आहेत.

गेल्या १५ दिवसांत अग्निशमन दलाकडे पावसामुळे नुकसान व पडझड झालेल्या घटनांचे २५९ कॉल्स नोंद आले. या दुर्घटनांत सुमारे १२.२७ लाखांचे नुकसान झाले आहे.

गेल्या २४ तासांत ११ कॉल्सची नोंद झाली असून झाडे पडून ३० हजारांचे नुकसान झाले. दरदिवशी राज्यात पावसामुळे नुकसानीचे सरासरी १७ कॉल्स नोंद होत आहेत. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढल्याने मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. घरांवर तसेच वाहनांवर झाडे पडून नुकसान झाले आहे.

७ ते ९ जूनपर्यंत सर्वाधिक घटना

उत्तर गोव्यातील म्हापसा आणि पेडणे या तालुक्यांमध्ये ३२ टक्के कॉल्स, मध्यवर्ती क्षेत्रात फोंडा, वाळपई येथे ३८ टक्के तर दक्षिण क्षेत्रात मडगाव व कुडतरी येथे ३० टक्के कॉल्स नोंद झाले आहेत. पावसामुळे पडझडीचे सर्वाधिक कॉल्स ७ ते ९ जून (१४२ कॉल्स) नोंद झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa : बीचवरच अवघ्या दीड हजारात 'ओपन एअर मसाज', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना आली जाग

Goa Crime: ट्रॉलर ऑपरेटरच्या खूनप्रकरणी इस्राएलचा जामीन पुन्हा नामंजूर

Mhadei Water Dispute: 'गोमंतकीयासाठी म्हादई पवित्र, सरकार ती विकणार नाही असे वचन द्या' - विजय सरदेसाई

मोदींचा तीनवेळा गोवा दौरा, तरीही श्रीमंत उमेदवाराचा पराभव; माजी मंत्र्यांची कॅप्टनच्या पाठीवर कौतुकाची छाप

SEBEX 2 Explosive: भारताने बनवले जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर स्फोटक! TNT पेक्षा दुप्पट घातक; नौदलाने घेतली चाचणी

SCROLL FOR NEXT