Goa Agriculture |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: सत्तरीत मिळणार स्‍वस्‍त, अन् मस्‍त भाजी!

Goa Agriculture: मुबलक लागवड : १०० किलो बियांची विक्री; रासायनिक खतांना फाटा, सेंद्रीय पद्धतीचा अवलंब

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: सत्तरी ही कृषीप्रधान तालुका. पण अलीकडच्‍या काही वर्षांत शेती, भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्षच झाले होते. कमी दिवसांत जास्त नफा मिळवून देणारे पीक म्हणजे भाजीपाला होय. योग्य नियोजन करून भाजीपाला लागवड आणि काढणी केल्यास त्‍यातून चांगला नफा मिळू शकतो.

म्‍हणून आता सत्तरी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करण्‍यात येत आहे. गेल्या वर्षीच्‍या तुलनेत यंदा वाळपई कृषी खात्याच्या कार्यालयातून आतापर्यंत सुमारे १०० किलोवर बियांची विक्री झाली आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. साहजिकच भाजीपालाही महागला आहे. काही लोक रासायनिक खतांचा वापर करून भाजीपाला पिकवतात व टिकवतात.

हे हानिकारक रसायन आपल्या शरीरात जाऊन अनेक आजार होतात. त्यामुळे आता समाजात जनजागृती केली जात असून शेतकऱ्यांचा विशेषत: युवकांचा ओढा सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला लागवडीकडे आहे. ते एक स्वयंरोजगाराचे साधन बनले असून मनुष्याला दैनंदिन आहारात लागणारा महत्त्वाचा घटक आहे.

ऑक्‍टोबरच्‍या शेवटच्या आठवड्यापासून कृषी कार्यालयात बियांची विक्री करण्यात सुरुवात केली आहे. यंदा १५० किलो बियाणे कृषी कार्यालयात आले होते. त्यातील १०० किलोवर बियाण्‍यांची विक्री झाली असून उर्वरित लवकरच संपण्‍याची शक्‍यता आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाण्‍यांची आयात केली जाईल. यंदा सत्तरीत सुमारे १० हेक्टर जमिनीत भाजीपाल्‍याची लागवड करण्यात येईल. मागच्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गोव्यात बेळगावातून भाजीची आयात केली जाते. मात्र दरच चढेच असतात. आता सत्तरीत पालेभाजीची लागवड वाढल्‍याने स्थानिकांना स्‍वस्‍त दरात ताजी भाजी मिळणार आहे. कृषी खात्यातर्फे बियांवर ५० टक्के सवलत देण्‍यात येत आहे. ही शेतकऱ्यांना प्रोत्‍साहन देणारी बाब मानली जातेय.

युवकांनी शेतीकडे वळावे : दिव्या राणे

सत्तरी हा कृषीप्रधान तालुका आहे. येथील युवकांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्राकडे वळावे. त्‍यामुळे ते स्‍वावलंबी बनतीलच शिवाय आपली कृषी संस्कृती टिकून राहण्‍यासही मदत होईल. आता सरकारतर्फे कृषी क्षेत्राच्‍या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.

त्याचा फायदा गरजू शेतकऱ्यांनी करून घ्यायला हवा. सत्तरीतील शेतकरी मेहनती आहेत. त्यामुळे त्यांना योग्य बाजारपेठ मिळण्‍यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन पर्येच्‍या आमदार तथा वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांनी केले आहे.

सत्तरीत यंदा मोठ्या प्रमाणावर भाजीच्‍या बियांची विक्री झालेली आहे. तसेच प्रत्येक बियांवर ५० टक्के सवलत असल्याने शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. अजूनही कृषी खात्‍यात बिया उपलब्ध आहेत. सरकारच्या विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यायला हवा. तसेच काही समस्‍या, अडचणी आल्‍यास कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

- विश्‍‍वनाथ गावस, वाळपई कृषी अधिकारी

कृषी खात्याकडे उपलब्ध भाजी बियाणे :

कोथिंबीर, भोपळा, दोडकी भाजी (रेखा), दोडकी (गरिमा), वाल, चिबूड, कोहळा, कारले (कथय), कारले (मिडोरी लांब), भेंडी (जेके ६२), भेंडी (राधिका), कोकणदूधी (वधन), मिरची (सितारा), चिटकी (पीएनबी), काकडी (राधिका), तांबडी भाजी, मुळा, नवलकोल, कळींगण.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘मी पत्रकार असतो तर ...’ सरदेसाईंच्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा; Watch Video

Mohammed Siraj: 'मी बोल्ड करतो, तेंव्हाच सेलिब्रेशन करतो'! टीका करणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांवर सिराजचा बाऊन्सर

Rainforest Challenge 2025: खडकाळ वाटा, पाणथळ रस्ता आणि 'रेनफॉरेस्ट चॅलेंज'चा थरार..

America Arms Supply: अमेरिकेने दिली पाकला शस्त्रे! भारताची आक्रमक भूमिका; 1971 ची बातमी केली Twit

Goa Assembly Live: रंगमंच कलाकार, उद्योजक परेश जोशी यांचे निधन

SCROLL FOR NEXT