Vaccination.jpg
Vaccination.jpg 
गोवा

Goa Vaccination: आज दिवसभरात 15656 नागरिकांनी घेतली कोरोना लस

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोना प्रतिबंधक लसिकरणात गोवा राज्याने देशातील ईतर राज्यांना लोकसंख्येच्या मानाने मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे.  राज्यात  18 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लसीकरण राज्यभरातील आरोग्य केंद्रे व टिका उत्सव अंतर्गत स्थापन केलेल्या लसीकरण केंद्रात सुरू आहे.(Goa Vaccination: Today 15656 citizens were vaccinated in Goa)

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 18 वर्षावरील 5 लाख 41 हजार 908 नागरिकांनी  कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे . 18 वर्षावरील नागरिकांची संख्या गोव्यात  11 लाखाच्या आसपास आहे. त्यातील 541908 लोकांनी पहिला डोस घेतलेला असल्यामुळे ही टक्केवारी 50.73 टक्के होत आहे. तर गोव्याच्या एकूण लोकसंख्येच्या 36.13 टक्के भरत आहे.

राज्यात आज तारीख 20 जून पर्यंत 745224  एवढे लसीकरण झाले आहे. राज्यात लसीचा फक्त पहिला डोस घेतलेल्या संख्या  541908 एवढी आहे. तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 101656 आहे. आज दिवसभरामध्ये  15656 नागरिकांनी  कोरोना  प्रतिबंधक लस घेतली. त्यामध्ये पहिला डोस घेतल्यांची  संख्या 15264 असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या  392 आहे.

दरम्यान लसिकरणात देशात गोव्यानंतर सिक्कीम, हिमाचल प्रदेश, त्रिपूरा, केरळ, गुजरात व दिल्ली यांचा क्रमांक आहे. या सर्वांची टक्केवारी 35 टक्के खाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

SCROLL FOR NEXT