आता नजरा विदेशी पर्यटकांकडे
आता नजरा विदेशी पर्यटकांकडे 
गोवा

गोवा पर्यटन: २० टक्के शॅक उभारणार, हॉटेल, लॉज, निवासी सुविधांवर मर्यादा

प्रतिनिधी

पणजी: कोविड टाळेबंदीनंतर आता पर्यटन क्षेत्राला उभारीसाठी विदेशी पर्यटकांची प्रतीक्षा आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील निर्बंध अद्याप पूर्णपणे मागे घेण्यात आलेले नाहीत, तरी पुढील महिन्यांपासून चार्टर्ड विमानांतून विदेशी पर्यटक येतील, अशी पर्यटक व्यावसायिकांना अपेक्षा आहे. दरम्यान, यंदा २० टक्के शॅक किनाऱ्यावर उभे राहतील, असे दिसते. तेवढ्याच व्यावसायिकांनी शॅक उभारणीसाठी उत्सुकता दर्शवली आहे.

शॅक मालक कल्याण संघटनेचे सरचिटणीस जॉन लोबो यांच्या म्हणण्यानुसार ७९-८० टक्के शॅक चालकांनी यंदा शॅक उभारणीत स्वारस्य राहिले नाही, असे सांगितले आहे. देशी पर्यटक येतील पण त्यांची पसंती शॅकना नसते. विदेशी पर्यटक शॅक पसंत करतात. त्यामुळे  यंदा शॅक व्यवसायात ८० टक्के घट होणार असल्याने अनेकांनी आतापासूनच शॅक उभारणी करायची नाही, असे ठरवले आहे.

पर्यटन खात्याकडे नोंदणी करून परवानगी मागितलेल्या ठिकाणी हॉटेल, लॉज, रिसॉर्टस्‌ आदी निवासी सुविधांना काही मर्यांदासह व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने संमती दिली आहे. मात्र, हे करताना कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटन संचालनालयाने जारी केलेल्या कार्यप्रणालीमध्ये (एसओपी) या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या संकेतस्थळावर ही कार्यप्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हॉटेल्स आणि रिसॉर्टस्‌ यांनी सर्व प्रवाशांची आगमनस्थळी थर्मल गन आदींसारख्या साहित्यामार्फत तपासणी करावी. फक्त लक्षणे नसलेल्या पर्यटक तथा प्रवाशांनाच प्रवेश द्यावा. सेवा देताना, तसेच वेटिंग रूम आदी सर्व ठिकाणी समाज अंतराचे पालन करावे. कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगसारख्या बाबीसाठी संबंधित प्रवाशाची माहिती प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत संबंधित प्रवाशाची ना हरकत घ्यावी. सर्व आवश्‍यक ठिकाणी हॅण्ड सॅनिटायजर ठेवावा. चलनाची हाताळणी करताना योग्य ती काळजी घ्यावी आणि डिजिटल माध्यमातून चलनाची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रवाशांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. याच पद्धतीने होम-स्टे, बी अँड बी, फार्म-स्टे आदींसाठीही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, केंद्रीय पर्यटन मंत्रालय, डब्ल्युएचओ, यूएनडब्ल्युटीओ यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेनुसार ही कार्यप्रणाली तयार केली आहे.

पर्यटकांची माहिती आवश्‍यक
हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या पर्यटकांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची प्रत्येक वेळी स्वच्छता करावी. पर्यटकांचा प्रवास आणि आरोग्य इतिहासाबाबतची सर्व माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज चेक-इन करण्यापूर्वी शक्‍यतो ऑनलाईन भरून घ्यावा. शक्‍य असल्यास क्‍यू आर कोडसारख्या प्रणालीतून स्वयं चेक-ईनसारख्या बाबी सुरू कराव्यात, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

मुलांचे मोकळे खेळणे बंद
हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये अभ्यागतांनी काय करावे आणि काय करू नये यासंदर्भातील माहिती त्यांना बूकलेट किंवा व्हिडिओच्या स्वरूपात देण्यात यावी. अभ्यागतांनी शक्‍य असल्यास त्यांच्या सामानाची स्वत: ने-आण करावी. एकापेक्षा जास्त लिफ्ट असल्यास आवर्जून वेगवेगळ्या लिफ्टचा वापर करण्यात यावा. रूम सर्व्हीस संपर्करहीत असावी. अभ्यागताने मागवलेली ऑर्डर रूमच्या बाहेर ठेवण्यात यावी. मुलांसाठीचे प्लेएरिया बंद राहतील, अशा बाबींचा सूचनांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ऑनलाईन नोंदणीचा पर्याय
जी हॉटेल्स पर्यटन खात्याकडे नोंद नाहीत, अशा हॉटेलांनाही व्यवसाय करता यावा. एखादी सदनिका भाड्याने देण्याचा व्यवसाय कोणी करत असेल तरी त्याच्या व्यवसायाला कायदेशीर वैधता देण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा पर्यटन खाते पुरवणार आहे. त्यासाठी नियमांत दुरुस्ती खात्याने प्रस्तावित केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT