Goa and Konkan News Dainik Gomantak
गोवा

Goa and Konkan News: लोकसभा अपडेट, गुन्हे, पर्यटन आणि राजकारण विश्वातील ठळक घडमोडींचा आढावा

Pramod Yadav

शस्त्रे बाळगण्यास मनाई, उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश

उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी संपूर्ण उत्तर गोवा जिल्ह्यात सर्व प्रकारची शस्त्रे, अग्निशस्त्रे, दारुगोळा, प्राणघातक शस्त्रे, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, चौकात, गल्लीबोळात किंवा कोणत्याही खुल्या जागी जवळ बाळगण्यास आचार संहिता लागू असेपर्यंत मनाई केली आहे.

तथापि वरील निर्बंध सार्वजनिक सेवक, पोलीस, संरक्षण कर्मचारी आणि कर्तव्यावर असलेले सुरक्षा कर्मचारी / क्रीडा व्यक्ती जे भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे सदस्य आहेत, बँकांचे जबाबदार व्यक्ती आणि त्यांचे राखणदार यांना लागू होणार नाहीत. याचे उल्लंघन केल्यास आयपीएस च्या कलम १८८ नुसार दंडनीय आहे.

थकबाकी न भरल्यास पूर्व सूचना न देता कनेक्शन तोडले जाणार

म्हापसा वीज खात्याच्या कार्यालयाने बार्देश तालुक्यातील थिवी, शिरसई, हणजूणे, आसगांव, शिवोली, सोडये, कामुर्ली, नास्नोडा, मयडे, कोलवाळे आणि संपूर्ण पेडणे तालुका, कळंगुट, कांदोळी, नेरुल, रेईस मागोस, सळगांव, सुकुर, पर्वरी, पेन्हा द फ्रांका, साल्वादोर द मुंद,

पिळर्ण, गिरी, हडफडे -नागोवा, वेर्ला-काणका, बस्तोडा, उकसई, पोंबुर्फा- एकोशी, ओळावली, हळदोणा, कारोणा, कालवी, किटला, खोर्जुवें, म्हापसा नगरपालिका भागातील वीज ग्राहकांनी आपली बिलांची थकबाकी असल्यास ती त्वरीत भरावी अन्यथा पूर्व सूचना न देता त्याची कनेक्शने तोडण्यात येतील असे कळविले आहे.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आल्तिनो-पणजी येथे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.

शिरगाव-मये खाण ब्लॉक-2 जनसुनावणीला आचारसंहितेचा फटका

जनसुनावणीला आचारसंहितेचा फटका. बुधवारी ता. 20 रोजी डिचोलीत निश्चित करण्यात आलेली शिरगाव-मये खाण ब्लॉक-2 साठीची जनसुनावणी पुढे ढकलल्याचे वृत्त. साळगावकर शिपिंग कंपनीला 'ईसी' मिळण्यासाठी होणार होती जनसुनावणी.

Mine Bloc-2 Goa

माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांची काँग्रेसने फसवणूक केली - सीएम सावंत

चिंबलकरांसाठी उपोषणाला बसलेल्या सांताक्रुझच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस (मामी) यांची काँग्रेसने फसवणूक केली. पुत्र रुडॉल्फ फर्नांडिस भाजपात दाखल होऊन त्यांनी काँग्रेसची तशीच फसवणूक केल्याचे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

Kankavli News: कोल्हापूर ते कणकवली व्हाया गोवा; फोंडाघाट येथे 10 लाखांची रोखड जप्त

कणकवली पोलिसांनी फोंडाघाट येथे 10 लाखांच्या रोखडसह कार जप्त केली आहे. वाहनाचा परवाना गोव्याचा असून, ते कोल्हापुरातून गोवा मार्गे सिंधुदुर्गाच्या दिशेने जात असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

Kankavli Police

पालिकेसंदर्भात कोणत्याही कामासाठी दलालांची मदत घेऊ नका - मुरगाव पालिका नगराध्यक्ष

पालिकेसंदर्भात कोणत्याही कामासाठी दलालांची मदत घेऊ नका. पालिकेत दलाल दिसल्यास सक्त कारवाई केली जाईल. नागरिकांना रोख, ऑनलाईन किंवा कार्ड पद्धतीने देयक रक्कम अदा करता येईल. मुरगाव पालिका नगराध्यक्ष गिरिष बोरकर यांची माहिती.

Mormugao Council

हणजूणमधील कर्णककर्श संगीतावर होणार कारवाई!

Anjuna Loud Music

रात्री 10 नंतर हणजूणमधील रहिवासी परिसरात खुल्या जागेत कुणी कर्णककर्श संगीत वाजवून ध्वनी प्रदूषण करत असल्यास ते आजपासून होणार बंद. याविषयी आपण पोलिसांना कारवाईचे निर्देश देणार, असे मुख्यमंत्र्यांचे संकल्प पत्र अभियान बैठकीत ग्रामस्थांना आश्वासन.

सर्व विरोधक एकवटले तरी गोव्यातील दोन्ही जागा आम्हीच जिंकू - सदानंद तानावडे

भारतीय जनता पक्षाने नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे आणि त्यांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो.

लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र येऊन लढले तरीही गोव्यातील दोन्ही जागा आम्हीच जिंकू असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

Sadanand Tanawade

शक्तीचे रुप सनातनी विरोधी लोकांना खरी जागा दाखवतील - मुख्यमंत्री सावंत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘शक्ती’च्या विरोधात संघर्ष करू असे विधान मुंबईतील सभेत रविवारी केले होते. याचा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.

मुळात सनातन धर्मातील शक्तीचे कुणीच सर्वनाश करू शकत नाही. राहुल गांधी तसेच इंडिया आघाडीला आगामी लोकसभेवेळी लोक तसेच शक्तीचे रुप सनातनी विरोधी लोकांना खरी जागा दाखवतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT