Shreya Dhargalkar  Dainik Gomantak
गोवा

Goa Top News: मुख्यमंत्र्यांची बैठक, राज्यातील शाळा, श्रेया धारगळकर प्रकरण; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Today's 27 May 2024 live News Breakings In Marathi: गोव्यात दिवसभर घडणाऱ्या ठळक घडमोडींचा आढावा.

Pramod Yadav

शाळा सुरू होण्याबाबत कोणताही बदल होणार नाही - CM

शाळा सुरू होण्याबाबत कोणताही बदल होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट. 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी असल्याने शाळा दोन दिवस उशिराने सुरू करण्याची गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केली होती मागणी.

वादग्रस्त व्हिडिओ प्रकरण; श्रेयाला उलट्या, पोटदुखीचा त्रास

श्रेया धारगळकरला उलट्या, पोटदुखीचा त्रास, तपासणीसाठी अझिलो, म्हापसा येथील रुग्णालयात दाखल. सर्व चाचण्या निगेटिव्ह तरीही श्रेयाकडून तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त. तब्येत चिंताजनक असल्याचा दावा श्रेयाने केला असून, योग्य तपासणी आणि उपचाराची गरज तिने व्यक्त केली आहे.

Shreya Dhargalkar

शाळा एक ते दोन दिवस उशिराने सुरु करा - दुर्गादास कामत

Goa Schools

शैक्षणिक वर्ष ४ जूनला सुरू होत आहे, तशी घोषणा शिक्षण संचालकानेही कालच केली आहे.

मात्र ४ जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी असल्याने व शिक्षक मतमोजणीत व्यस्त असल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी यंदा शाळा एक किंवा दोन दिवस उशिरा म्हणजेच ५ किंवा ६ जूनला सुरू कराव्यात, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी केली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शिक्षणमंत्री सुद्धा असल्याने त्यांनी यावर सहानुभूतिपूर्वक विचार करावा, असेही कामत यांनी म्हटले आहे.

स्मार्ट सिटीचे 95 टक्के काम पूर्णत्वाच्या दिशेने - मुख्यमंत्री

स्मार्ट सिटीचे 95 टक्के काम पूर्णत्वाच्या दिशेने. येत्या दोन दिवसांत स्मार्ट सिटीचे संचालक संजित रॉड्रिग्ज, महापौर रोहित मोन्सेरात व नगरपालिका यांच्याकडून कामांची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलीय.

राज्यात भाडेकरु नोंदणी बंधनकारक - पोलिस महासंचालक

राज्यात भाडेकरु नोंदणी बंधनकराक असून, नोंदणी न करणाऱ्या घरमालकांना दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिली आहे. बऱ्याचवेळा राज्यातील गुन्ह्यात परराज्यातील नागरिकांचा सहभाग असतो, आणि पोलिसांपासून लपण्यासाठी ते फरार होतात, असे सिंग म्हणाले.

धोकादायक झाडे कापण्याचा पंचायतींना अधिकार!

पंचायतींनी पावसापूर्वी धोकादायक झाडे तोडावीत. काही वाद असल्यास उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करुन प्रक्रिया पूर्ण करावी. धोकादायक झाडे पाडताना दुर्घटना होणार नाही यासाठी योग्य काळजी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन.

पावसापुर्वीची अत्यावश्यक कामे करण्यासाठी सरकारकडून निधी!

पावसापुर्वीची अत्यावश्यक कामे करण्यासाठी पणजी महापालिकेला १ लाख, पालिकांना ५० हजार तर पंचायतींना २५ हजार रुपयांचा निधी सरकार देणार. मुख्यमंत्र्यांची माहिती‌.

नव्या इंग्रजी प्राथमिक शाळांना मान्यता देणार नाही! मुख्यमंत्री सावंत

नव्या इंग्रजी प्राथमिक शाळांना सरकार मान्यता देणार नाही. कोणी मराठी,कोंकणीतून मान्यता घेऊन इंग्रजी माध्यम सुरू केले असल्यास होणार कारवाई. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंतांनी केले स्पष्ट.

CM Sawant

इंग्रजी शाळांना कोकणी भाषा मंडळाचा विरोध

Konkani Bhasha Mandal

नव्या इंग्रजी शाळांना कोकणी भाषा मंडळाचा विरोध. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून घेण्याचा अट्टहास. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी.

Konkani Bhasha Mandal

अखेर! नानोडा कालव्यात बुडालेला मृतदेह सापडला

Nanoda Drowning Case

नानोडा येथे कालव्यात बुडालेला दीप बागकर (17) याचा मृतदेह सापडला. दीप हा मित्रांसह पोहायला गेला असताना घडलेली दुर्घटना.

Nanoda Drowning Case

मोपा विमानतळावर जिवंत काडतुसासह बँकेचा वरिष्ठ अधिकारी ताब्यात

Mopa Airport

मोपाच्या मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर जिवंत काडतुसांसह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात. अधिक तपास सुरू.

Manohar International Airport At Mopa Goa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठे यश; पाचजणांना अटक, हल्ल्याचे कारण येणार समोर?

Ankola Road Accident: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! अंकोलाजवळ बस आणि टँकरची समोरासमोर धडक; दोघे जागीच ठार, पाच जखमी

Rama Kankonkar Assault: 'दोषींना सोडणार नाही...' रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; कठोर कारवाईचे दिले निर्देश

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

SCROLL FOR NEXT