शिरगाव येथे गरीब महिलेच्या घराची भिंत कोसळली. ऐन पावसात देवता गावकर या महिलेवर संकट. सोमवारी सायंकाळची घटना. अनर्थ टळला.
फेअरा बाईक्सा, म्हापसा येथील तेंडुलकर यांचे 100 वर्षे जुने घर आज (15 जुलै) कोसळले. सततच्या पावसामुळे गेल्या सोमवारी एका बाजूची भिंत कोसळली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या पूजा शर्माच्या फौजदारी रिव्हिजन अर्जाची सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. शर्माकडून तिच्या अर्जाचे फौजदारी रिव्हिजन अर्जावरुन अटकपूर्व जामीन अर्जात रुपांतर करण्याची मागणी. या अर्जावर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी होणार.
गोव्याचे नवे डीजीपी अलोक कुमार यांनी आज (15 जुलै) आपल्या पदाचा ताबा घेऊन कामास सुरु केली.
भंडार वाडा, प्रभाग क्र 1, पेन्हा दी फ्रँका येथील रघुनाथ रातबोले यांच्या मालकीच्या पडक्या घराची भिंत कोसळली. पर्वरी अग्निशमन दल आणि पोलिसांनी पेन्हा दी फ्रँकाच्या तलाठ्यांसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
मोटोज येथे टाटा सुमो आणि अग्निशामन दलाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात फादर थॉमस ( कुळे, पिलार) जखमी झाले. शिगाव येथे घरावर कोसळलेले झाड काढण्यासाठी अग्निशामन दल जात असताना ही घटना घडली.
कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा कोसळली दरड. ट्रॅकवरील माती आणि चिखल दूर करण्यासाठी पावसाचा अडथळा. कोकण रेल्वेच्या पाच गाड्या रद्द करण्यात आल्या असून, पाच गाड्या वेगळ्या मार्गाने वळवल्या आहेत.
सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत, सीएसएमटी ते मडगाव मांडवी एक्सप्रेस, सावंतवाडी ते दादर तुतारी एक्सप्रेस, मँगलोर जंक्शन सीएसएमटी, मडगाव दिवा पँसेंजर या रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत.
केरीतील अंजुणे धरणाची पातळी ९० मीटरपासून ६०० सेंटीमीटर दूर आहे. आज सकाळी ८९.४ मीटर पातळी झाली असून साखळीतील नदीची व पावसाची परिस्थिती पाहून पाणी सोडणार - धरण अधिकारी.
सनबर्न ने परवानगी साठी अजून अर्ज केला नाही. आलाच तर त्यावर विचार करू. पण सगळ्या गोष्टींना विरोध करून मग दक्षिण गोव्यात काहीच होत नाही हे म्हणणे चुकीचे. काही राजकारणी पहिल्यांदा विरोध करतात आणि मग इव्हेंट चे पासेस मागतात - पर्यटन मंत्री रोहन खंवटे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.