Indian Super League Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवा अखेर पराभूत

किशोर पेटकर

Indian Super League: एफसी गोवाची इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अपराजित मालिका अखेर घरच्या मैदानावरच भेदली गेली.

सलग १२ सामने पराभव न पत्करलेल्या संघाला बुधवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मोहन बागान सुपर जायंट्सने १-० असे निसटते हरविले. निर्णायक गोल ७४व्या मिनिटास दिमित्रिओस पेत्रातोस याने नोंदविला.

एफसी गोवाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग चेंडू रोखण्यासाठी जागा सोडून पुढे आल्याची संधी ऑस्ट्रेलियन आघाडीपटूने अचूक साधली. बॉक्सबाहेरून सणसणीत फटक्यावर त्याने संघाला आघाडी मिळवून दिली.

त्यापूर्वी शानदार गोलरक्षणाने मोहन बागानची आक्रमणे उधळून लावलेल्या अर्शदीपने जागा सोडणे एफसी गोवाला नुकसानकारक ठरले.

नवे प्रशिक्षक अंतोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा हा सलग दुसरा, तर एकंदरीत आठवा विजय ठरला.

मोहन बागानचे आता २६ गुण झाले असून ते तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. स्पर्धेतील पहिल्या पराभवामुळे एफसी गोवा २८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम राहिला. पहिल्या क्रमांकावरील ओडिशा एफसी ३१ गुणांसह अव्वल स्थानी आहे.

कोलकाता येथे स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात एफसी गोवाने मोहन बागानला ४-१ असे पराभूत केले होते, त्याचा वचपा पाहुण्या संघाने बुधवारी काढला.

सामन्याच्या पूर्वार्धात एफसी गोवाच्या ओडेई ओनाइंडिया याचा गोल वैध ठरला असता, तर कदाचित सामन्यातील चित्र वेगळे दिसले असते.

एफसी गोवाचा आता पुढील सामना २१ फेब्रुवारी रोजी फातोर्डा येथे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल.

दृष्टिक्षेपात सामना...

- आयएसएल स्पर्धेत ८ विजय व ४ बरोबरीनंतर एफसी गोवा पराभूत

- फातोर्ड्यात यंदा ४ विजय व १ बरोबरी नोंदविल्यानंतर एफसी गोवाची हार

- आयएसएल स्पर्धेतील एफसी गोवाविरुद्ध ७ सामन्यात मोहन बागानचे ५ विजय

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT