Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

पेडणे आणि बार्देश तालुक्यातील वीज समस्या सुटणार; वीजमंत्री ढवळीकरांनी केली मोठी घोषणा

Rajat Sawant

Sudin Dhavalikar : पुढील वर्षापासून बार्देश आणि पेडणे तालुक्यात वीज खंडीत होणार नाही. बार्देश आणि पेडणे तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 350 कोटी रुपयांचे नवे सबस्टेशन उभारण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. येत्या 15 दिवसांत निविदा निश्चित करण्यात येणार आहे अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

ढवळीकर म्हणाले, बार्देश आणि पेडणे तालुक्यात 350 कोटी रुपयांचे नवे सबस्टेशन उभारण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. येत्या 15 दिवसांत निविदा निश्चित करण्यात येतील. येत्या एका वर्षात या दोन्ही तालुक्यातील वीज पुरवठ्यात सुधारणा दिसेल.

भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात हाय टेंशन्स वायर टाकण्यात आल्या होत्या. कंडक्टर जुने झाले आहेत ते बदलण्याचे काम सुरु आहे. तसेच लाईनम आणि हेल्पर यांना सुरक्षा उपकरणे देण्यात आली आहेत.

सासष्टी व वाळपई या भागात नागरिकांना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकारी प्रयत्न करीत आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत येथील नागरिकांच्या वीजेच्या समस्या सुटतील असे आश्वासन यावेळी वीजमंत्री ढवळीकर यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT