Goa Navratri Festival | Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa Navratri Festival: महिलांना दुर्गेचा मान द्या- सुदिन ढवळीकर

Goa Navratri Festival: फोंड्यात बंगाली असोसिएशनचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

दैनिक गोमन्तक

Goa Navratri Festival: दुर्गा ही जगजननी तर आहेच, ती सर्वांची माता असून प्रत्येक कुटुंबातील महिलांना दुर्गेचा मान द्यावा. माता, भगिनींचा आदर केला पाहिजे, असे उद्‍गार वीजमंत्री सुदिन ढवळीकर (Power Minister Sudin Dhavalikar) यांनी काढले.

कुर्टी - फोंडा येथील सावित्री सभागृहात फोंडा बंगाल असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवातील कार्यक्रमाचे उद्‍घाटन केल्यानंतर सुदिन ढवळीकर बोलत होते. उसगाव मठाचे स्वामी महेशात्मानंद, कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, मगोपचे नेते डॉ. केतन भाटीकर, कुर्टीचे सरपंच नावेद तहसीलदार, पंचसदस्य बाबू च्यारी व फोंडा बंगाल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

ढवळीकर म्हणाले की, बंगाल असोसिएशनने आपल्या परंपरा जपून ठेवताना गोमंतकीयांशी चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. आपण सर्व भारतीय आहोत, ही भावना प्रत्येकाच्या मनात रूजली पाहिजे, असे सांगून यंदाचा दसरा, दिवाळी सर्वांसाठी सुखसमृद्धी घेऊन येवो, अशी शुभेच्छा व्यक्त केली.

स्वामी महेशात्मानंद म्हणाले, बंगाल असोसिएशनने परंपरा जपताना गोमंतकीयांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवले असल्यामुळेच आज गोमंतकीयांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली आहे. त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. केतन भाटीकर यांनीही विचार व्यक्त करताना सर्वांना शुभेच्छा दिल्या. उद्‍घाटनानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास लोक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Land Scam: मडगावात भूखंड देण्याच्या बहाण्याने 42.50 लाखांची फसवणूक; फातोर्डा येथील एकाविरोधात गुन्हा दाखल

कोंकणा सेन '7 वर्ष लहान' बॉयफ्रेंड सोबत गोव्यात, डेटिंगच्या चर्चांना उधाण; सोशल मीडियावर Photos Viral

Verna Accident: वेर्णा येथे चार वाहनांचा विचित्र अपघात; जिवितहानी टळली

Rama Kankonkar Assault: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सहाजणांकडून जीवघेणा हल्ला; हल्लेखोर फरार

घटस्थापनेला नवनिर्वाचित समितीकडे पदभार, 'GCA'च्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची अपेक्षा

SCROLL FOR NEXT