Damodar Sal Margao Dainik Gomantak
गोवा

Damodar Sal Margao: पोलिसांनीच लपवली चोरी? तीन महिन्यांपूर्वी श्री दामबाबच्या अंगावरील दागिने पळवणारा चोरटा अटकेत

Damodar Sal Margao: 'गोमन्तक'च्या ऑनलाईन पेजवर ही बातमी ब्रेक झाल्यानंतर कित्येक नेटिझन्सनी पोलिसांच्या या कृतीवर कडक शब्दांत टीका केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Damodar Sal Margao

मडगावातील प्रसिद्ध अशा दामोदर साल मंदिरात तीन महिन्यांपूर्वी चोरी होऊन सुमारे एक लाख रुपयांचे सुवर्णालंकार चोरण्यात आल्याची घटना फातोर्डा पोलिसांनी तब्बल तीन महिने लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे. काल या प्रकरणातील संशयित चोरटा हाती लागल्यावर हे चोरीचे प्रकरण पोलिस दफ्तरी नोंद करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

पोलिसांचा हा अजब कारभार दै. 'गोमन्तक'च्या ऑनलाईन टीमने उघडकीस आणल्यानंतर समाजमाध्यमांवरून कित्येकांनी ताशेरे ओढले आहेत.

वास्तविक ही चोरीची घटना १० फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांत सुशांत शेणई यांनी तक्रार दिली होती. एक अज्ञात इसम मोटरसायकलवरून आला आणि त्याने देवाच्या अंगावरील एक सोन्याची माळ आणि सोन्याचे पेडंट चोरून नेल्याचे या तक्रारीत म्हटले होते.

मात्र फातोर्डा पोलिसांनी हे प्रकरण नोंद करुन घेतले नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी या प्रकरणातील संशयितविकास वसंत नाईक शिरोडकर (शिरोडा) हा पोलिसांच्या हाती लागल्यावर काल हे प्रकरण नोंद केले गेले.

या चोरीत सुमारे एक लाखाचा ऐवज चोरीस गेला होता. ही चोरी उघडकीस आल्यानंतर फातोर्डा पोलिस विकास वसंत नाईक शिरोडकर (शिरोडा) हा पोलिसांच्या हाती लागल्यावर काल हे प्रकरण नोंद केले गेले.

या चोरीत सुमारे एक लाखाचा ऐवज चोरीस गेला होता. ही चोरी उघडकीस आल्यानंतर फातोर्डा पोलिस स्थानकाचे निरीक्षक नाथन आल्मेदा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, "आम्ही या प्रकरणात तुम्हाला अधिक माहिती देऊ शकत नाही" असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यातील मंदिरे आता चोरट्यांच्या निशाण्यावर आलेली आहे. काही दिवसांपूर्वी गजबजलेल्या म्हापसा शहरात रस्त्यालगत असलेल्या श्री बोडगेश्वर देवस्थानात चोरी झाली होती. त्यानंतर अन्य काही ठिकाणच्या मंदिरांतही चोऱ्या झाल्या होत्या.

आम्ही या प्रकरणात प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देऊ शकत नाही. या प्रकरणी आम्ही एकाला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे, असे फातोर्डाच्या पोलिस निरीक्षक नाथन आल्मेदा असे त्यांनी सांगितले.

नेटिझन्सकडून कडक शब्दांत टीका

'गोमन्तक'च्या ऑनलाईन पेजवर ही बातमी ब्रेक झाल्यानंतर कित्येक नेटिझन्सनी पोलिसांच्या या कृतीवर कडक शब्दांत टीका करताना, लहान-सहान बातम्यांना पोलिस वारेमाप प्रसिद्धी देतात. मात्र अशा चोरीच्या घटना ते का लपवून ठेवतात? असा सवाल उपस्थित केला आहे.

या प्रकरणात दक्षिण गोव्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही फोन न घेतल्याने तो होऊ शकला नाही.

खरे कारण पोलिसांनाच माहीत : शंखवाळकर

काही प्रसारमाध्यमांनी श्री दामोदर सालात चोरी झाली आहे अशी बातमी ब्रेक केल्यानंतर हे मंदिर ज्या नायक शंखवाळकर यांच्या घरात आहे, त्यांच्याशी संपर्क साधला असता, ही चोरी आताची नसून ती तीन महिन्यांपूर्वी घडली होती असे त्यांनी सांगितले.

मात्र या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद का केला नाही, याची आम्हाला कल्पना नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT