Goa Police
Goa Police Dainik Gomantak
गोवा

दंड वाढूनही गोव्यात नियमांना केराची टोपली

दैनिक गोमन्तक

मडगाव : सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत अनिवार्य केलेल्या भरघोस दंडानेही वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे थांबवलेले नाही. मडगाव परिसरात वाहतूक नियमभंग प्रकरणी कारवाईवरून हे आता दिसून आलं आहे. मडगाव आणि आसपासच्या भागातील दोन हजारहून अधिक वाहन चालकांचे किमान तीन महिन्यांच्या कालावधीसाठी चालक परवाने निलंबित करण्यात आले आहेत. दक्षिण गोवा वाहतूक पोलिस विभागाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या वाहतूक गुन्ह्यांमध्ये अति वेगाने वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे, वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे अशा गोष्टींचा समावेश आहे.

गेल्या पाच महिन्यातील कारवाईत वाहनांच्या काळ्या काचा (31,394), गाडी चालविताना चालक वा सहचालकाने सीट बेल्ट न घालणे (34,573), नो एन्ट्री (21,308), नंबरप्लेट नसणे (10,759), धोकादायक पार्किंग (25,439) यांचा समावेश आहे.

...तरीही दुचाकीस्वार बेजबाबदारच

यावर्षी गेल्या 5 महिन्यांत हेल्मेट न वापरल्याची प्रतिदिन 500 हून अधिक प्रकरणे नोंद होत आहे. वाहतूक पोलिस विभागाने  राज्यात मोटार वाहन कायद्यान्वये सुमारे 54 विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. त्यात अधिकतर प्रकरणे ही विना हेल्मेट (77,819) प्रकरणे नोंद झाली आहेत.पोलिसांनी सूचना आणि वारंवार मार्गदर्शन करूनही विना हेल्मेट रस्त्यावर बेजबाबदार असलेल्या दुचाकीस्वारांची संख्या वाढतच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT