Goa Online Marathi News And Live Updates | Breaking News 
गोवा

Goa Online Marathi News: दिवसभरातील ठळक घडामोडींचा आढावा घ्या एका क्लिकवर

Pramod Yadav

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! Arts, Science, Commerce, Vocational streams बंद होणार

गोवा सरकारचा महत्वाचा निर्णय. पुढील शैक्षणिक वर्षापासून 11 वी 12 वी ला subject based admission घेतली जातील. Arts, Science, Commerce, Vocational शाखा बंद करुन फक्त 12 वी पास अशी सर्टिफिकेट देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दुर्देवी! 33 केव्हीच्या वीज वाहिनाचा स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू

33 केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने अवंतीनगर,तिस्क उसगांव येथील एका युवकाचे दुर्देवी निधन. फोंडा म्हालसावाडा येथे मातीचा भराव टाकून नॅशनल हायवेचे काम सुरु असलेल्या ठीकाणी घडली दुर्घटना.

मातीच्या भरावापासून 3 ते 4 मीटर उंचीवर असलेल्या 33 केव्हीच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती.

सरकारने पहिल्यांदा नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे - विजय सरदेसाई

सरकारने पहिल्यांदा नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला मंत्रिमंडळाची मान्यता उत्तर नसणारे अनेक प्रश्न उपस्थित करते.

गरजूंना मोफत उपचार देणे हा रुग्णालयाचा मूळ उद्देश आहे, तोच प्राथमिक उद्देश राहणार का? स्थानिकांना प्रतिनिधींमार्फत ट्रस्टमध्ये त्यांचे मत मांडता येईल का? उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा रुग्णालय सुसज्ज केले जाणार होते त्याचे काय? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत लोकांच्या शंका आणि भीती दूर होऊ शकत नाही. सार्वजनिक आरोग्य शोषक होऊ नये आणि त्याच्या सेवांचा नफेखोरीसाठी वापर केला जाऊ नये.

ब्रह्ममेशानंदाचार्य स्वामींनी पणजीत रात्री दहानंतर भेट द्यावी - उदय मडकईकर

तपोभूमी पीठाधीश ब्रह्ममेशानंदाचार्य स्वामींनी पणजीत रात्री दहानंतर भेट द्यावी आणि कॅसिनो व्यवसाय कसा चालला आहे व पणजीतील लोकांना कॅसिनोंच्या नावावर काय पहावे आणि सोसावे लागत आहे याचा अनुभव घ्यावा, नगरसेवक, माजी महापौर उदय वामन मडकईकर यांचे वक्तव्य.

म्हापसा येथील घराला आग, 5 लाख रुपयांचे नुकसान

Mapusa Fire News

पेडे क्रीडा संकुल, म्हापसा येथील घराला आग. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण. आगीत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज. रोख रक्कम, महत्वाची कागदपत्रे जळून खाक. आगीचे कारण अस्पष्ट.

Mapusa Fire News

Mapusa Fire News पर्यटकांवरील हल्ले; कळंगुट पोलिसांची टॅक्सी चालकांसोबत बैठक

पर्यटकांवरील वाढते हल्लेप्रकरणी कळंगुट पोलिसांची पोलिस निरीक्षक परेश नाईक आणि पोलिस उपअधीक्षक विश्वेश करपे यांच्या उपस्थितीत टॅक्सी चालकांसोबत महत्वाची बैठक. फ्रोटा माइल्सने दाखल केलेल्या तक्रारींचे निराकरण करण्याचा बैठकीचा उद्देश होता.

Taxi owner and calangute police

शापोरा मार्केटजवळ झोपडीला आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

शापोरा मार्केटजवळ झोपडीला आग लागल्याचा प्रकार समोर आला. अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Goa Fire News

हरमल येथे अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Fatal Accident At Arambol

दुचाकी अपघातात रॉबर्ट फर्नांडिस (52, रा. गिरकर वाडो, हरमल) यांचे निधन. रॉबर्ट यांचा पहाटे गुलजा कॅफे, वरचा वाडो येथे अपघात. उपचारासाठी त्यांना तुये येथील आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले. पोलिस तपास सुरु.

मायनिंग डंप धोरणाला सरकारची मान्यता!

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मायनिंग डंप धोरणाला मान्यता. सरकारला अंदाजे 200 कोटींचा महसूल मिळणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची माहिती‌.

Goa Cabinet Meeting

दक्षिण गोव्यात होणार खाजगी वैद्यकीय महाविद्यालय!

South Goa Medical College

दक्षिण गोव्यात खाजगी तत्वावर होणार नवे वैद्यकीय महाविद्यालय. सरकारच्या ट्रस्ट मार्फत होणार वैद्यकीय महाविद्यालय. ट्रस्टच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री असणार तर विरोधीपक्षनेते असणार सदस्यपदी.

वादाची शक्यता, मयेतील कळसोत्सव अखेर रद्द

मयेतील कळसोत्सव अखेर रद्द. यंदाही कळसाची घरोघरी भेट नाही. भाविक भक्तांमध्ये नाराजी. श्री सातेरी मंदिरातून देवीचा कळस महामाया मंदिरात. वाद निर्माण होण्याच्या शक्यतेने देवस्थान समितीचा निर्णय.

Mayem

डोंगुर्ली ठाणे पंचायतीच्या सरपंचपदी निलेश परवार बिनविरोध

डोंगुर्ली ठाणे पंचायतीच्या सरपंचपदी निलेश परवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळत्या सरपंच सरिता गावकर यांनी अलिखीत करारानुसार दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.

गोवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ

गोवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ. महागाई भत्ता पोहचला 50 टक्क्यांवर. एक जानेवारीपासून लागू व थकबाकीही मिळणार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT