bjp  Dainik Gomantak
गोवा

Goa News: भाजप दक्षिण गोवा जिल्हा समितीची घोषणा; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Goa News : गोव्यात राजकारण, पर्यटन, क्रीडा - कला - संस्कृती, गुन्हे, अपघात, शिगमोत्सव यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या बातम्या.

Pramod Yadav

भाजप दक्षिण गोवा जिल्हा समितीची घोषणा

भाजपच्या दक्षिण गोवा समितीची घोषणा करण्यात आली. प्रभाकर गावकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यविजय नाईक, महेश नाईक, अनिता थोरात, प्रदीप नाईक यांची उपाध्यक्षपदी गणपत नाईक, शर्मद रायतूरकर सरचिटणीस, परिमल सामंत, जोर्जिना गामा, विश्वनाथ (अपूर्व) दळवी, मच्छिंद्र देसाई, आशा गावस यांची सचिवपदी तर परेश नाईक यांची खजिनदारपदी तर इतर 33 जणांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

वेळूसमध्ये 50 'मॉडल घरे' उभारण्यासाठी जागा निश्चित; आरोग्यमंत्री राणेंची माहिती

चरावणे धरण प्रकल्पाला माझा पाठिंबा आहे. हे धरण झाले पाहिजेच. तसेच, वाळपई पालिका क्षेत्रातील वेळूस गावात 50 'मॉडल घरे' उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याचे देखील आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले.

Goa Police: पोलिस कॉन्स्टेबल फाळे यांनी बजावले कर्तव्य; 5 लाखांचे सुवर्णलंकार असलेली पर्स महिलेला केली परत

कुठ्ठाळी पूलावर 5 लाखांचे सुवर्णलंकार असलेली पर्स पोलिस कॉन्स्टेबल सोनू पाळे यांना सापडली. चौकशीनंत ही पर्स बार्देशातील महिलेची असल्याचे समोर आले. त्यांनी त्यांची पर्स परत करण्यात आली. कॉन्स्टेबल फाळे मडगाव पोलिस ठाण्यात सेवा बजावण्यासाठी जात असताना त्यांना ही पर्स सापडली असल्याचे सांगितले जाते.

Goa Politics: 'आम्ही सरकार चालवतो, एनजीओ नाही'; पणजीतील आंदोलनावर मंत्री राणे स्पष्टच बोलले

आम्ही लोकांमधून निवडून येतो. निवडून आलेले लोक सरकार चालवतात, एनजीओ नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. गुरुवारी (21 मार्च) पणजीत झालेल्या आंदोलनावर विश्वजीत राणेंची प्रतिक्रिया.

Goa Politics: तज्ञांना घेऊन आम्ही पुन्हा नियम आणि अटी तयार करू - विश्वजीत राणे

कलम १७ (२) रद्द झालेले नाही.उच्च न्यायालयाने नियम व अटी रद्द केल्या आहेत. न्यायालयाचा आदेश सरकारने पूर्णपणे मानून घेतलाय. न्यायालयाने आम्हाला ६ आठवड्यांची मुदत दिली आहे. तज्ञ वकील व इतर तज्ञांना घेऊन आम्ही नव्याने नियम आणि अटी तयार करू, असं विश्वजीत राणे

Bicholim: जेसीबीचा धक्का लागून जलवाहिनी फुटली

डिचोली शहरात जेसीबीचा धक्का लागून जलवाहिनी फुटल्याचं समोर आलंय. शेकडो लिटर पाणी वाया गेलं आहे. गटार स्वच्छ करताना ही जलवाहिनी फुटली.

गिरी - म्हापसा येथे वाहनाच्या धडकेत घोडा गंभीर जखमी

गिरी - म्हापसा येथे वाहनाच्या धडकेत एक घोडा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हरमल सरपंचपदी अनुपमा मयेकर यांची बिनविरोध निवड

फणसाचे झाड कोसळून घराचे 75,000 चे नुकसान, दीड वर्षीय मुलगा जखमी

धामसे- सत्तरी येथे घरावर फणसाचे झाड कोसळून ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसचे, दीड वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.

पर्वरीत उड्डाणपुलाची कमान घेऊन जाणाऱ्या क्रेनखाली सापडून दुचाकी चालक ठार

सुकूर, पर्वरी येथे उड्डाणपुलाची कमान घेऊन जाणाऱ्या क्रेनच्या चाकाखाली सापडून दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. जुन्या महिंद्रा शोरूम इमारतीसमोर भरधाव दुचाकी रस्त्यावर घसरून हा अपघात झाला. विशाल काणकोणकर (२९, रा. नागाळी, ताळगाव) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सायं. ६च्या सुमारास हा अपघात घडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

SCROLL FOR NEXT