Goa Made Liquor Seized Dainik Gomantak
गोवा

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गात ओरोस येथे 38 लाखांचा माल जप्त

Goa Made Liquor Seized: सकाळी 10:35 वाजताचे दरम्याने आयशर टेम्पो क्र. MH-07-AJ-6059 हा गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले.

Ganeshprasad Gogate

Goa Made Liquor Seized: गोव्यातून परराज्यात दारू वाहतूक होण्याचे प्रकार सर्रास घडत असून चेकपोस्टवर पोलिसांच्या सतर्कपणामुळे हा माल कित्येकदा अडवला जातो. सोमवारी अशाच प्रकारे कारवाई सिंधुदुर्गात करण्यात आलीय.

गोवा बनावटीची दारु वाहतूक करताना सिंधुदुर्ग पासिंगचा आयशर टेम्पो पकडुन 38 लाख 43 हजार 600 रुपयांची दारू ओरोस खर्येवाडी येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पकडली आहे. या बेकायदेशीर वाहतुकीप्रकरणी एकाला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार 4 मार्च 2024 रोजी आयशर टेम्पो क्रमांक MH-07-AJ-6059 मधून गोवा बनावटीच्या दारुची गोवा-मुंबई हायवेने वाहतूक होणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग यांचे नेतृत्वाखाली गोवा ते मुंबई जाणारे महामार्गावर ओरोस, खर्येवाडी येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

सकाळी 10:35 वाजताचे दरम्याने आयशर टेम्पो क्र. MH-07-AJ-6059 हा गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले.

हा टेम्पो थांबवून चालक व टेम्पोचे हौद्यामधील मालाची खात्री केली असता टेम्पोमध्ये गोवा बनावटीच्या दारुने भरलेले 828 पुठ्याचे बॉक्समध्ये 38 लाख 43 हजार 600 रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारु व 15 लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा मिळून एकूण 53 लाख 43 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT