Goa Live News Update 17 January 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa Daily News Wrap: गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडींचा आढावा, एका क्लिकवर

Pramod Yadav

वास्कोत 'मटका' तेजीत

वास्कोत मटका जुगार तेजीत. शहरासह विविध ठिकाणी दिवसा ढवळ्या मटका सुरु. सरकारी यंत्रणा मटका जुगारावर कारवाई करत नसल्याने, सामान्य नागरीकांनी व्यक्त केली चिंता.

वास्को थिएटर, मुरगाव पालिकेचे पुर्वीचे भाजी मार्केट, मॉर्डन मार्केट जवळ, एस बी आय बँकच्या बाजूस, पालिकेच्या रहिवासी इमारतीच्या हद्दीत तर काही ठिकाणी उघड्यावर मटका घेतला जातोय.c

एफसी गोवाचा सलग दुसरा विजय

सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये ब्रायसन फर्नांडिस याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवाने सुपर कप फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या लढतीत त्यांनी बंगळूर एफसीला १-० फरकाने नमविले.

कॅसिनोसमोरुन वाटसरु पर्यटकाचा मोबाईल लांबवला

पणजी कॅसिनोसमोरुन वाटसरु पर्यटकाचा मोबाईल चोरी केल्याची घटना उघडकीस आलीय. चोरटे दुचाकीवरुन आले आणि तीस हजार किमतीचा मोबाईल चोरी केला.

मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्टचे आमिष, साळगावातील महिलेला 13.80 लाखांचा गंडा

मॉडेलिंग कॉम्ट्रॅक्टचे आमिष देऊन साळगावातील महिलेला 13.80 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. सायबर क्राईम विभागाने अज्ञात फेसबुक युझरविरोधात गुन्हा नोंद केलाय.

मोपा विमानतळाच्या आवारात ठेवलेला 5.80 लाखांच्या भंगाराची चोरी

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानळ परिसरात ठेवण्यात आलेल्या तब्बल 5.80 लाख रुपये किंमतीच्या भंगाराची चोरी उघडकीस आली आहे. पोलिसांनी समीर हलीमशाह याला अटक केलीय.

बोडगेश्वर जत्रा 24 जानेवारीपासून

यंदाच्या जत्रोत्सवात देव बोडगेश्र्वरला दोन सुवर्ण कडा तसेच चांदीची उत्सव मूर्ती वर्धापनदिनी देवस्थान समिती अर्पण करणार. बोडगेश्वर जत्रा 24 जानेवारीपासून, देवस्थान अध्यक्ष आनंद भाईडकर यांची माहिती.

डॉमिनिकच्या तडीपार मागणी विरोधातील याचिका निकालात

डॉमिनिक डिसोझाच्या तडीपार मागणी विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून निकालात. डॉमिनिकच्या याचिकाकर्त्याने स्वेच्छेने मागे घेतली याचिका. उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला याचिकाकर्ते उत्तर देतील आणि तडीपार आदेश निघाला असेल तर वकील त्या आदेशाला आव्हान देऊ शकतील, असे न्यायालयाने म्हटले आहे.

व्हडले भाट परिसरात इंधन साठा नसल्याचा गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा खुलासा 

दाबोळी - चिखली माटवे व्हडले भाटात जुआरी इंडियन ऑईल अदानी वेन्चर कंपनीच्या भूमिगत वाहिनीतून पेट्रोल - डिझेल मिश्र इंधन, चिखली व्हडले भाट परिसरात भूमिगतरित्या विहिरीत - नाल्यात - शेत जमिनीत पाजरत गेल्याची माहीती उपलब्ध नसल्याचा असा खुलासा गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहिती हक्क कायद्याखाली दिली आहे.

व्हडले भाट परिसरातील विहिरीत एनेनाफथिलीन पदार्थ आढळला आहे. या पदार्थातून प्लास्टिक तयार होतो अशी माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली असल्याचे चिखली पंचायतीचे माजी सरपंच प्रताप म्हार्दोळकर यांनी दिली आहे.

व्हडले भाट परिसरात इंधन साठा नसल्याचा खुलासा गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचा दावा माजी सरपंच म्हार्दोळकर यांनी केला.

अरविंद केजरीवाल गुरुवारपासून गोवा दौऱ्यावर

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गुरुवारपासून गोवा दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी केजरीवाल आढावा घेतील.

जमीन हडप प्रकरणी एसआयटीकडून आरोपपत्र दाखल

चार जमीन हडप प्रकरणी राज्य तपास पथकाने आरोपपत्र दाखल केले आहे. मोहम्मद सोहेल या चारही प्रकरणात संशयित आरोपी आहे.

साळगावात विषबाधा करुन दोन भटक्या कुत्र्यांना जीवे मारले

साळगाव येथे विषबाधा करुन दोन भटक्या कुत्र्यांना जीवे मारल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT