गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी शुक्रवारी (14 मार्च) बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तारावर मोठे वक्तव्य केले. तवडकर म्हणाले की, 'सरकार मंत्रिमंडळ फेरबदलाचा प्रश्न येत्या 15 दिवसांत सोडवणार आहे.' दरम्यान, निलेश काब्राल, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, दिलायला लोबो आणि मायकेल लोबो यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते.
धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर साळगाव पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवत लोकांनी सुरक्षित होळी साजरी करावी आणि रस्त्यावर रंग आणि कचरा फेकू नये असे आवाहन केले आहे.
सावंत सरकारने गोवा शालेय शिक्षण नियम, 2025 मध्ये सुधारणांचा मसुदा प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये पाच दिवसांच्या आत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. प्रस्तावानुसार, पहिली ते पाचवी आणि नववीचे वर्ग जून ते एप्रिल दरम्यान सुरु होतील, तर सहावी ते दहावी आणि बारावीचे वर्ग एप्रिल ते मार्च दरम्यान सुरु होतील. नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी एक आठवड्याची सुट्टी असेल.
राज्यात तापमानाचा पारा आज आणि उद्याही चढताच राहणार असल्याचे हवामान विभााकडून सांगण्यात आले आहे. दोन दिवसांसाठी हवामान विभागाने तापमानाचा यलो अलर्ट जाहीर केला
होळीच्या पूर्वसंध्येला जीआरबी कॉलनी सदा वास्को येथे एका कौटुंबिक वादातून जीवघेणा प्रकार घडला. येथे परवानगीशिवाय दुचाकी नेल्याच्या वादातून मल्लिकार्जुन घिवारी (45) याने त्याचा मोठा भाऊ श्रीकांत घिवारी (50) याला चाकूने वार केले. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
आज देशभरासह गोव्यातही धूलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही धूलिवंदनाचा आनंद लुटत गोमंतकीयांना धूलिवंदानाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नैसर्गिक रंग वापरण्याचे गोमंतकीय जनतेला आवाहन केले.
धार्मिक भावना दुखावणे, वंश - धर्माच्या आधारावर दोन गटांत शत्रुत्व निर्माण केल्याच्या आरोपखाली सूरज आरोंदकर (रा. काणका, बार्देश) याला पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. ब्रम्हेशानंदाचार्य स्वामींच्या अनुयायांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.