Goa Konkani Academy Dainik Gomantak
गोवा

Goa Konkani Academy: गोवा कोकणी अकादमीच्या योजनांसाठी मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Goa Konkani Academy scheme: गोवा कोकणी अकादमीने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी विविध योजना जाहीर करून लेखक, प्रकाशक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक संस्थांकडून अर्ज मागवले आहेत.

Sameer Amunekar

पणजी: गोवा कोकणी अकादमीने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी विविध योजना जाहीर करून लेखक, प्रकाशक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक संस्थांकडून अर्ज मागवले आहेत. सुरुवातीला अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट होती. मात्र ती मुदत वाढवून आता १२ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे.

अकादमीच्या योजनांमध्ये चंवर योजना (पहिल्या पुस्तकासाठी ७५% आर्थिक मदत), साहित्य प्रभा योजना (७०%), बालसाहित्य प्रकाशन (७०%), कोकणी नाटक-मांड (७५%), लोकवेद पुस्तक प्रकाशन (७०%), शैक्षणिक साहित्य प्रकाशन (७०%), तसेच अनुवादित व लिप्यंतरित साहित्य प्रकाशन यांसारख्या योजना समाविष्ट आहेत.

याशिवाय क्लॅरिसा वाझ ई मोरेनास संशोधन शिष्यवृत्ती, संगीत साहित्य प्रकाशन, दुर्मिळ साहित्य पुनर्प्रकाशन अशा विशेष योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

शैक्षणिक, बालसाहित्य, लोकसाहित्य, अनुवाद आणि संगीत या विषयांवरील कार्यशाळा/शिबिरांना आर्थिक सहाय्य, कोकणी शैक्षणिक शिष्यवृत्ती (बी.ए./एम.ए./पीएच.डी.), संगीत कार्यक्रम निर्मिती आणि लोकवेद संशोधन प्रकल्पांसाठीही अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्जाचे नमुने गोवा कोकणी अकादमीच्या कार्यालयात, गोवा संचार भवन, बीएसएनएल इमारत, ५वा मजला, पाटो, पणजी येथे उपलब्ध आहेत, असे अकादमीने कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Alert: 'चतुर्थी'काळात पावसाचे संकट! 4 दिवस 'यलो अलर्ट' जारी; जोरदार सरी कोसळण्याची शक्यता

बिहारचे मुद्दे आणि चेहरे; मतदारयादी शुद्धीकरण, व्होट-चोरीचा आरोप आणि लालूंचे 'जंगल राज'

Horoscope: गणपतीच्या आराधनेने होतील अडथळे दूर, तुमच्या राशीनुसार कोणते बदल आवश्यक? जाणून घ्या

Opinion: 'पार्सल संस्कृती'चा गैरवापर; युवा पिढी बर्बाद होण्यास वेळ लागणार नाही

Ganesh Festival In Goa: गोव्यात 1961 नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात, आज प्रत्येक गल्लीबोळात पाहायला मिळतो बाप्पाचा जल्लोष

SCROLL FOR NEXT