Kalasa Banduri project
Kalasa Banduri project Dainik Gomantak
गोवा

Kalasa Project: कर्नाटक पाटबंधारे मंत्र्यांची दादागिरी म्हणे, कळसा-भांडुराचे महिन्याभरात भूमिपूजन, नाहीतर....

दैनिक गोमन्तक

Kalasa Project: म्हादई जललवादाने दिलेल्या राज्याच्या वाट्यानुसार पाणी वळविण्यात येत आहे. यात गैर काहीच नाही. कळसा, भांडुरा प्रकल्पाचे एका महिन्यात भूमिपूजन करून वर्षाच्या आत काम पूर्ण नाही केले, तर नाव बदलेन, अशी दादागिरीची भाषा कर्नाटकचे पाटबंधारे आणि जलस्रोत मंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे. कर्नाटकच्या या भूमिकेवरून गोव्यातील नेत्यांनी या विरोधात तितक्याच तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

म्हादई खोऱ्यातील कळसा-भांडुरा पाणी प्रकल्पाच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्याला केंद्रीय जल आयोगाने परवानगी दिली आहे. याशिवाय म्हादई जलविवाद लवादाने केलेल्या पाणी वाटपानुसार आम्ही पाणी वळवत आहोत.

त्यामुळे हा जलप्रकल्प कोणीही रोखू शकत नाही, असे म्हणत एका महिन्याच्या आत या प्रकल्पाचे भूमिपूजन करून वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी निवडणूक प्रचारबाजी घोषणा कर्नाटकच्या पाटबंधारे मंत्र्यांनी केली आहे.

जल आयोगाने दिलेल्या डीपीआर मंजुरीमुळे राज्यात संताप उसळला असून राजकीय नेते-कार्यकर्ते, तसेच जनतेतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. त्यातच करंजोळ यांचे वक्तव्य म्हणजे गोवा सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांवर पाणी ओतून राज्यातील जनतेच्या दुःखावर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

जल आयोगाने मंजुरी दिलेल्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गोव्यातून आम आदमी पक्षाचे शिष्टमंडळ काल घटनास्थळावर गेले होते.

सुरुवातीला या शिष्टमंडळाला कर्नाटकातील स्थानिक कर्मचाऱ्यांनी अडवले आणि अरेरावीची भाषा केली. नंतर या शिष्टमंडळात ‘आप’चे आमदार असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी माफी मागून या भागाची पाहणी करण्यास परवानगी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रेटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

High Court Order: वृद्ध सासूसोबत राहण्यास पत्नीचा नकार; उच्च न्यायालयाने दिला घटस्फोटाचा आदेश

SCROLL FOR NEXT