Goa It is wrong to criticize the health department
Goa It is wrong to criticize the health department 
गोवा

गोवा: ''ऊठसूट आरोग्य खात्यावर टिका करणं गैर''

दैनिक गोमंतक

पणजी: राज्यातील आरोग्य यंत्रणा चांगले काम करत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात सरकारला काही अंशी यश आले आहे. त्यामुळे ऊठसूट आरोग्य खाते चांगले काम करत नाही, अशी टीका करणे गैर आहे.  गेले दीड वर्ष राज्यातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस अथक परिश्रम करत आहेत. सुट्ट्यासुद्धा त्यांना दिल्या जात नाहीत. त्यामुळेच काही प्रमाणात कोरोना नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत आरोग्य खाते कामच करत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे, वारंवार टीका न करता सकारात्मक सूचना कराव्यात. या सूचनांचे अवश्य पालन केले जाईल, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी सांगितले. (Goa It is wrong to criticize the health department)

विरोधी पक्षाच्या काही आमदारांनी आरोग्य खाते चांगले काम करत नसल्याचे म्हटले होते. त्यांना उत्तर देताना विश्‍वजित राणे यांनी सांगितले, की बाहेर राहून टीका करणे सोपे आहे.  टीका करणाऱ्यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय तसेच दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात येऊन कोरोना नियंत्रण कामाची पहाणी करावी त्यानंतरच बोलावे. कोरोना संकटाची जाणीव दोन वर्षापूर्वी नव्हती. त्यामुळे ऑक्सिजनची गरज एवढ्या मोठ्या प्रमाणात लागणार याची जाणीव नव्हती. आता सर्व गोष्टींची गरज लागत असून त्यासाठीचे योग्य ते उपाय केले जात आहेत.

ऑक्सिजनचे नवे प्रकल्प उभे केले जात असून अद्याप तरी राज्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑक्सिजन पुरवठ्याची सर्व जबाबदारी घेतलेली असून ते स्वऔतः जातीने ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवून आहेत. सरकार एकसंघपणे कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT