Goa Government efforts to amend Goa Lokayukta Act Application for extension in Goa Bench
Goa Government efforts to amend Goa Lokayukta Act Application for extension in Goa Bench 
गोवा

गोवा लोकायुक्त कायदा दुरुस्तीसाठी सरकारचे प्रयत्न ; मुदतवाढीसाठी गोवा खंडपीठात अर्ज

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी : गोवा लोकायुक्त कायद्यानुसार लोकायुक्त पदासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती करता येते. या पदासाठी गोवा सरकारने नावे मागवूनही निवृत्त न्यायमूर्ती मिळणे मुष्किलीचे बनले आहे. त्यामुळे या कायद्यातच दुरुस्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकायुक्त नियुक्तीसाठी तीन महिन्यांची खंडपीठाने दिलेली मुदत संपल्याने सरकारने ती वाढवून घेण्यासाठी गोवा खंडपीठात अर्ज केला आहे. 


मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवा सरकारने लोकायुक्तची नियुक्ती तीन महिन्यांत केली जाईल, असे आश्‍वासन दिल्याने ॲड. आयरिश रॉड्रिग्ज याची निकालात काढण्यात आली होती. ही तीन महिन्यांची मुदत काल २२ डिसेंबरला संपली तरी लोकायुक्तची नियुक्ती सरकारने केलेली नाही. यासंदर्भात ॲड. रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, सरकारने आदेशाचे पालन न केल्याने गोवा खंडपीठ स्वतः अवमान याचिका घेऊ शकत नाही, तर येत्या काही दिवसांत मी अवमान अर्ज सादर करणार आहे.   

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT