Goa Exclusion of industries from lockdown The decision is welcomed by GSIA
Goa Exclusion of industries from lockdown The decision is welcomed by GSIA 
गोवा

गोवा: लाॅकडाऊनमधून उद्योगांना वगळण्याच्या निर्णयाचे जीएसआयएकडून स्वागत

गोमंतक वृत्तसेवा

मडगाव : लाॅकडाऊनमध्ये  किराणा दुकाने व हाॅटेल - रेस्टाॅरंटची किचन खुली ठेवण्याचा तसेच औद्योगिक क्षेत्राला लाॅकडाऊनमधून वगळण्याच्या मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या निर्णयाचे गोवा राज्य औद्योगिक संघटनेने (जीएसआय) स्वागत केले आहे. उद्योगांना लाॅकडाऊनमधून वगळा अशी सूचना या पूर्वी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार त्यांनी उद्योगांवर निर्बंध लागू केले नाहीत. मागच्या लाॅकडाऊनमुळे निर्माण झालेल्या स्थितीतून आताच सावरत असलेल्या उद्योगांना पुन्हा लाॅकडाऊन लागू केले असते तर औद्योगिक क्षेत्राला मारक ठरले असते, असे जीएसआयएचे अध्यक्ष दामोदर कोचकर (Damodar Kochkar) यांनी सांगितले.(Goa Exclusion of industries from lockdown The decision is welcomed by GSIA)

काही उद्योगांच्या उत्पादनांना नुकत्याच आॅर्डर मिळू लागल्या होत्या. या आॅर्डरची पूर्तता ठराविक कालमर्यादेतच करावी लागते. उत्पादन प्रक्रिया बंद झाल्यास त्याचा गोव्याच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसला असता, असे मत कोचकर यांनी व्यक्त केले. कोविड संबंधीत सर्व नियमांचे पालन करून उद्योग सुरु ठेवण्यात येतील याची हमी सर्व उद्योग सरकारला देत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

जनतेत भिती पसरून खरेदीसाठी गर्दी होऊ नये यासाठी  किराणा मालासह सर्व जीवनावश्यक वस्तुंची सेवा, तसेच हाॅटेल - रेस्टाॅरंटची किचन खुली ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News Update: मुलाखतीदरम्यान विवस्त्र होण्याची मागणी, चिंबल येथील महिलेची सायबर पोलिसांकडे तक्रार

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत कथित पैसे वाटपाबाबतचा टिकलोंचा दावा कोर्टाने फेटाळला: कार्लुस फेरेरा

मडगाव रिंग रोडजवळ बेकायदेशीररित्या झाडांची कत्तल; समाजसेवकांनी व्यक्त केली चिंता

Lok Sabha Election 2024: गोव्यातील इंडियन रिझर्व्ह बटालियनचे 920 पोलिस मतदानापासून राहणार वंचित?

Lok Sabha Election 2024: ''जगात आदर्श ठरलेली भारतीय लोकशाही नष्ट करण्याचा डाव''; गोव्यातून अलका लांबा कडाडल्या

SCROLL FOR NEXT