फातोर्डा : एका 27 वर्षीय युवकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी काल रात्री उशिरा तिघांना अटक केली आहे. झुबेर सय्यद (२३), जब्बार सय्यद (25) समीर आणि हरीस शेख (26) (सर्व चंद्रवाडा-फातोर्डा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
(Goa Crime Three arrested by fatorda police in case of assault)
फातोर्डा पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी सायंकाळच्या वेळी चंद्रवाडो-फातोर्डा येथील रहिवासी असलेल्या संदीप नाईक गावणेकर (27) यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करताना नमूद केले आहे की, सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास अल्फा कॉर्नर, चंद्रवाडो येथे आरोपी जब्बार, जुबेर, इम्रान, समीर यांच्यासह अन्य 15 अज्ञात व्यक्तींनी फिर्यादीला जबर मारहाण केली.
याबरोबरच जीवे मारण्याची धमकीही दिली. तसेच उभ्या असलेल्या ट्रकवर फिर्यादीला ढकलून दिले आणि पूर्ववैमनस्यातून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, गिरेंद्र नाईक यांनी ही घटना जातीय स्वरूपाची असली तरी पूर्ववैमनस्यातून दोन्ही बाजूंमध्ये घडल्याच्या अफवांचे खंडण केले आहे. फातोर्डा पोलिस स्थानकात दोन्ही बाजूंकडील लोकांचे दोन गट जमले होते. त्यावरही पोलिसांनी नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.