Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गांजा बाळगल्याप्रकरणी कळंगुटमध्ये महाराष्ट्रमधील एकाला अटक

गांजा बाळगल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी मूळच्या महाराष्ट्रमधील एका ३५ वर्षीय तरुणाला रंगेहाथ पकडून अटक केली.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News

गांजा बाळगल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी मूळच्या महाराष्ट्रमधील एका ३५ वर्षीय तरुणाला रंगेहाथ पकडून अटक केली. अंकुश काळे असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी ८४० ग्रॅम वजनाचा ८४ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरबोवाडा येथील बोडकेवड जंक्शनजवळ ही कारवाई केली. याठिकाणी संशयित येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजाराम बागकर यांनी इतर पोलिस कर्मचाऱ्यांसोबत ही कारवाई केली.

दरम्यान, कळंगुट पोलिसांनी शुक्रवारी उस्मानाबाद, महाराष्ट्रमधील एका २८ वर्षीय युवकाकडून ९६० ग्रॅम वजनाचा ९६ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता.

राज्यात अमली पदार्थ विक्रेत्यांचा सुळसुळाट

दोन दिवसांपूर्वी, थिवी रेल्वे स्टेशनजवळ अंमली पदार्थांवर धाड टाकून दोन पुरुषांना पोलिसांनी रंगेहात पकडले. प्रभुदत्त त्रिपाठी (वय 28, ओडिशा) आणि श्याम सुंदर सिंग (वय 23,ओडिशा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून 5.10 किलोग्रॅम वजनाचा सुमारे 5 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार!म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

SCROLL FOR NEXT